belgaum

कुमारस्वामी लेआउटमध्ये घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील कुमारस्वामी लेआउट परिसरामध्ये घरफोडीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

बुधवारी रात्री पुन्हा एकदा अज्ञात चोरट्याने घरफोडीचा प्रयत्न केला असून, त्याची ही संपूर्ण हालचाल स्थानिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

या परिसरातील रहिवासी गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांच्या त्रासामुळे अत्यंत त्रस्त झाले आहेत. रात्रीच्या वेळी बंद घरांना लक्ष्य करून चोरटे परिसरात दबा धरून फिरत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

 belgaum

ताज्या घटनेत चोरट्याची दृश्ये सीसीटीव्हीत समोर आल्याने स्थानिक रहिवाशांमधील चिंता अधिकच वाढली आहे.

सदर घटना बेळगाव एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या वाढत्या चोऱ्यांचा तातडीने बंदोबस्त करावा आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी रात्रीची गस्त अधिक तीव्र करावी, अशी आग्रही मागणी परिसरातील ग्रामस्थांनी व नागरिकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.