belgaum

त्या घरावरील ईडी छाप्यात १३.३ कोटींची मालमत्ता जप्त

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव विभागाचे अबकारी अतिरिक्त आयुक्त वाय. मंजुनाथ यांच्या निवासस्थानावरील सक्तवसुली संचालनालयाच्याछाप्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर मालमत्ता उघडकीस आली आहे. वाय. मंजुनाथ हे बेळगावातील एका ज्येष्ठ नेत्याच्या जवळच्या नातेवाईकाचे भाऊ असून, ईडीने कारवाई पूर्ण केल्यानंतर या छाप्याचा अधिकृत तपशील जाहीर केला आहे.

या शोधमोहिमेदरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांनी एकूण १३.३ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. यामध्ये ५.५ कोटी रुपयांची रोकड, ७.८ कोटी रुपये मूल्याचे सोन्या-चांदीचे दागिने आणि ३.३ लाख रुपयांचे परदेशी चलन जप्त करण्यात आले आहे.

याव्यतिरिक्त कॅश बुक आणि रिअल इस्टेटशी संबंधित अनेक महत्त्वाची आर्थिक कागदपत्रे ईडीच्या ताब्यात आली आहेत. या जप्त केलेल्या दस्तऐवजांच्या आधारे अधिकाऱ्यांनी पुढील तपास वेगाने सुरू केला आहे.

 belgaum

ईडीने वरिष्ठ अबकारी अधिकारी वाय. मंजुनाथ, जगदीश नायक आणि के. एम. तम्मण्णा यांच्या बेळगाव, मैसूर आणि बेंगळुरू येथील १४ ठिकाणांवर छापे टाकले. या कारवाईत एक डायरी जप्त करण्यात आली असून, ज्यामध्ये अबकारी परवाना मंजूर करण्यासाठी आणि नूतनीकरणासाठी वेगवेगळ्या दारू दुकानांमधून दरमहा नियमितपणे घेतलेल्या लाचेच्या रकमेची नोंद आहे.

हा पैसा बेनामी व्यवहार आणि नातेवाईकांच्या नावे मालमत्ता खरेदीसाठी वापरल्याचे तपासात समोर आले असून ईडीकडून पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.