बेळगाव लाईव्ह :”व्हिजन कर्नाटका द्वितीय ” या महाप्रदर्शनाला बेळगावकरांनी ऊस्फूर्त प्रतिसाद दिला. मला खात्री आहे की या प्रदर्शनातून मिळालेल्या योजनांच्या माहितीतून बेळगावच्या विकासाचे बीज रुजेल, असे प्रतिपादन खासदार जगदीश शेट्टर यांनी केले.
बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली येथील प्रयास एक्झिबिशनच्यावतीने आणि जीएमसीएलसी 160 या स्वंयसेवी संस्थेच्या सहकार्याने केएलई सोसायटीच्या कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित “व्हिजन कर्नाटका द्वितीय” या प्रदर्शनाच्या आज गुरूवारी दुपारी केएलईच्या बी. एस. जिरगे सभागृहात झालेल्या शानदार समारोपावेळी ते बोलत होते. यावेळी मंचावर रमेश देशपांडे, माजी नगरसेवक रमेश ऊप्पीन, एलआईसीचे सीनियर डीव्हिजनल मैनेजर एस. ए. अल्लाबाशा व मार्केटिंग मैनेजर पी. हरिनाथ, रेल्वेचे वरिष्ठ व्यवस्थापक मंजूनाथ, प्रयासचे चेअरमन वनीश गुप्ता, संचालिका मीतू पाल-गुप्ता आदी मान्यवर उपस्थित होते.
शासकीय विभागांचा पारितोषिकाने गौरव : समारोप सोहळ्यात प्रदर्शनात सहभागी झालेल्या विविध शासकीय विभागांना उत्कृष्ठ सादरिकरणासाठी पारितोषिके देऊन गौरविन्यात आले. पारितोषिक विजेते पुढील प्रमाणे आहेत. बेस्ट स्टॉल इन हेल्थ: आईसीएमआर. बेस्ट इन माइनिंग: जियोलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया. बेस्ट स्टॉल इन डिफेन्स: ट्रुब्स कंफर्ट लिमिटेड, इंडियन ऑप्टेन लिमिटेड. बेस्ट स्टॉल इन रेल्वे: साऊथ वेस्टर्न रेल्वे. बेस्ट स्टॉल इन सायन्स एंड टेक्नोलॉजी: कॉउन्सिल ऑफ साइंटिफिक एंड इंड्स्ट्रीयल रिसर्च, इंडियन इंस्टिट्यूट ऑफ ऐस्ट्रो फिजिक्स. बेस्ट स्टॉल आयटी एंड इंजिनिअरींग: नॅशनल इंफोमेटीक सेंटर और नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी,
कर्नाटका. बेस्ट स्टॉल इन स्पेस: इस्रो. बेस्ट स्टॉल इन एनवोरमेंट: इंडियन इंस्टिट्यूट ऑफ फोरेन्स मैनेजमेंट और मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्स. बेस्ट स्टॉल इन सोसल वेल्फेयर: आर्टिफिसियल लिम्स मनेफैकच्चरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. बेस्ट स्टॉल इन एनिमल हजबैंडरी: सेंट्रल पोल्ट्री डेवलपमेंट ओर्गनैझेशन. बेस्ट स्टॉल इन नार्थ ईस्ट डेवलपमेंट : नार्थ ईस्टर्न रिजनल अग्रीकल्चर मार्केटिंग कॉर्पोरेशन.

गेले तीन दिवस सुरु असलेल्या “व्हिजन कर्नाटका द्वितीय” प्रदर्शनाला बेळगाव शहर आणि परिसरातील सुमारे 22 हजाराहूंन अधिक शाळा महाविद्यालायाच्या विद्यार्थ्यांनी तसेच नागरिकांनी भेट दिली. त्यांच्या अपूर्व प्रतिसादामुळे हे प्रदर्शन घरोघरी पोहोचले.
सुनीता देसाई यांनी सांगता समारंभाचे सूत्रसंचालन केले तर मीतु पाल यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी भाजपा सेक्रेटरी नागराज पाटील, पंकज रायमाने, संतोष पवार, दत्ता थोरे, आदिति सक्सेना, महक गिरबानी, विशाल मलिक, अफझल खान, विनोद कुमार आदिनी विशेष परिश्रम घेतले.




