belgaum

भाषिक अल्पसंख्याक समिती स्थापन करा :म ए समिती

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : कर्नाटकातील मराठी भाषिकांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी जिल्हास्तरीय भाषिक अल्पसंख्याक समिती तातडीने स्थापन करावी, तसेच मतदार याद्या मराठी भाषेत प्रकाशित कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, माजी आमदार मनोहर किनेकर आणि माजी महापौर मालोजी अष्टेकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने गुरुवारी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेऊन यासंदर्भात चर्चा केली आणि निवेदन सादर केले.

भाषिक अल्पसंख्याकांच्या तक्रारी आणि अडचणी सोडवण्यासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वी आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप समितीची स्थापना झालेली नसल्याने ती लवकरात लवकर गठित करावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.

 belgaum

या समितीसाठी मराठी भाषिक महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रतिनिधींची नावे यापूर्वीच प्रशासनाकडे सादर करण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

तसेच, मुख्य निवडणूक आयुक्तांच्या कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार मतदार याद्या मराठी भाषेतही प्रसिद्ध कराव्यात, अशी मागणी करण्यात आली. मराठी भाषिक नागरिकांना निवडणूक प्रक्रियेतील माहिती सहज उपलब्ध व्हावी, यासाठी मराठी भाषेतील मतदार यादी महत्त्वाची असल्याचे शिष्टमंडळाने स्पष्ट केले.

यावेळी माजी नगरसेवक रणजीत चव्हाण पाटील, शेखर पाटील यांच्यासह महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

भाषिक अल्पसंख्याक समितीची स्थापना आणि मराठीतील मतदार याद्यांचा मुद्दा प्रशासनाने गांभीर्याने घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा शिष्टमंडळाने व्यक्त केली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.