बेळगाव लाईव्ह :सांबरा एअरपोर्ट रोडजवळ महादेव नगर परिसरात झालेल्या दुचाकी अपघातानंतर रुग्णवाहिका तब्बल एक तास उशिरा घटनास्थळी पोहोचल्याने स्थानिक रहिवासी आणि घटनास्थळी उपस्थित लोकांमध्ये रोष निर्माण झाल्याची घटना काल शुक्रवारी घडली.
मिळालेल्या माहिती नुसार, सांबरा, महादेवनगर परिसरात काल शुक्रवारी सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास म्हैस रस्त्यावर अचानक आडवी येताच संतुलन गमावल्याने एका दुचाकी वाहनाला अपघात झाला.
या अपघातात दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाला होता. आसपासच्या नागरिकांनी जखमीला तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यासाठी प्रयत्न केले.

त्यासाठी प्रथम रुग्णवाहक सेवेला घायाळाच्या स्थितीबद्दल माहिती दिली, मात्र सरकारी रुग्णवाहिका ताबडतोब न पोहोचता सुमारे एक तास उशिरा घटनास्थळी दाखल झाली.
रुग्णवाहिकेच्या विलंबाचा परिणाम घटनास्थळी उपस्थित नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला होता. या प्रकारामुळे काहींनी आपत्ती व्यवस्थापनातील उदासीनतेवर प्रश्न उपस्थित केले.




