बेळगाव लाईव्ह: प्यास फाउंडेशनतर्फे मुतगे (ता. जि. बेळगाव) ग्रामपंचायत हद्दीतील कंचननगर येथील स्वातंत्र्यपूर्व काळातील जवळपास 300 वर्षे जुन्या विहिरीचे पुनरुज्जीवन केले जाणार असून या कामाचा भूमिपूजन कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला.
पाण्याचे रक्षण व संवर्धन करण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या व्यास फाउंडेशनतर्फे तलावांसह वापरात नसलेल्या जुन्या विहीरींचे पुनरुज्जीवन करून लोकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जाते. त्याच उद्देशाने कंचननगर येथील 300 वर्षे जुन्या वापरात नसलेल्या विहिरीचे पुरुष जीवनाचे कार्य हाती घेतले जाणार आहे. या कामाचा शुभारंभ नुकताच प्यास फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. माधव प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली भूमिपूजनाने झाला.
यावेळी बोलताना डॉ माधव प्रभू यांनी त्यास फाउंडेशनची स्थापना, स्थापनेचा उद्देश व कार्याची थोडक्यात माहिती दिली. समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या विचारातून आणि आपल्या भावी पिढीला मुबलक पाणी उपलब्ध रहावे या उद्देशाने आम्ही तलाव व विहिरींच्या पुनरुज्जीवनाचे हे कार्य करत आहोत असे सांगितले .
आम्ही या विहिरीचे पुनरुज्जीवन करून ती स्वच्छ करून तिचे नूतनीकरण करून देणार आहोत या कार्यात ग्रामपंचायत व गावकऱ्यांचे सहकार्यही अपेक्षित असून त्यांनी विहीर पुनरुज्जीवनाच्या कामावर लक्ष ठेवावे तसेच आम्ही विहिरीचे पुनर्जीवन करून ती तुमच्या ताब्यात दिल्यानंतर विहिरीची ग्रामपंचायत आणि स्थानिक रहिवाशांनी व्यवस्थित देखभाल ठेवली जावी ही विनंती डाॅ. माधव प्रभू यांनी केले.
कार्यक्रमास भरतेश फाउंडेशनचे चेअरमन डॉ विनोद दोड्डनावर स्वाती जोग व त्यांचे सर्व सहकारी, प्यासचे उपाध्यक्ष संरक्षण दलाचे कंत्राटदार अभिमन्यू, सुभाष ओऊळकर, सूर्यकांत हिंडलगेकर, अजय आचार्य, मुतगे ग्रा.पं. पीडिओ बसवंत कडेमणी, भरमा पाटील, महावीर गुडाज, दीपक पुरी, शामराव पाटील, माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष सातेरी पाटील, सयाजी पाटील, सिद्धाप्पा पाटील, ॲड. अशोक बसापुरे, सुरज पाटील, बाळाराम चौगुले ॲड. हिरेमठ, कदमसर, कृष्णा पाटील, लक्ष्मण रामजी, उमेश पुरी आणि कंचननगरवासीय उपस्थित होते.




