belgaum

सिद्धरामय्या राजीनामा देणार? कर्नाटकात नेतृत्व बदलाच्या चर्चांना वेग

0
Cm sidharamayya
 belgaum

बेळगाव लाईव्ह : कर्नाटकच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राज्यात नेतृत्व बदलाच्या चर्चांना मोठा वेग आला आहे.

दिल्लीतील काँग्रेस हायकमांडसोबत झालेल्या अलीकडील बैठकीनंतर सिद्धरामय्या यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षाची (CLP) महत्त्वाची बैठक लवकरच होण्याची शक्यता असून, त्यामध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर चर्चा होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

काँग्रेस नेतृत्व राज्यातील सत्ताबदल नियोजित पद्धतीने करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. मात्र अंतिम निर्णय घेण्यापूर्वी सिद्धरामय्या यांनी काही वेळ मागितल्याचीही चर्चा आहे. त्याचबरोबर त्यांना राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची जबाबदारी देऊन राज्यसभेत पाठवण्याचाही पर्याय पक्ष नेतृत्वाकडून विचाराधीन असल्याचे समजते.

 belgaum

दरम्यान, उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार हे मुख्यमंत्रीपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. मात्र काँग्रेस पक्षाकडून अद्याप कोणत्याही नेतृत्व बदलाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

दुसरीकडे काँग्रेसमधील काही नेत्यांनी या सर्व चर्चांना केवळ तर्कवितर्क असल्याचे सांगितले आहे. तरीही राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींमुळे पुढील काही दिवस कर्नाटकच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

याच पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकी होळी यांना कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची तसेच उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी मिळू शकते, अशी जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.