belgaum

एकोप्याचे दर्शन देणारी कॅम्प मधील दौड

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह: श्री दुर्गामाता दौडीच्या दुसऱ्या दिवशी कॅम्प परिसरात धार्मिक उत्साहासोबत सामाजिक सलोख्याचेही दर्शन घडले. दरवर्षीप्रमाणे यंदाही माजी कॅन्टोन्मेंट बोर्ड उपाध्यक्ष साजिद शेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी श्री दुर्गामाता दौडीचे स्वागत करून धारकऱ्यांना फळांचे वाटप केले. या उपक्रमातून त्यांनी हिंदू-मुस्लिम ऐक्य आणि बंधुभावाचा संदेश दिला.

बेळगावातील श्री दुर्गामाता दौड ही धार्मिक श्रद्धा, परंपरा आणि सामूहिक उत्साहाचे प्रतीक मानली जाते. कॅम्प परिसरात दरवर्षी दौड दाखल होत असताना साजिद शेख आणि त्यांचे सहकारी उपस्थित राहून धारकऱ्यांचे स्वागत करतात. प्रेमाने स्वागत करून फळांचे वाटप करण्याच्या या उपक्रमातून सामाजिक एकोप्याची भावना जपली जाते.

यंदाही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कॅन्टोन्मेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम मंचलवार आणि मराठा सेंटरचे ब्रिगेडियर गिरीश उपाध्याय यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती होती.

 belgaum

यावेळी साजिद शेख (माजी उपाध्यक्ष, कॅन्टोन्मेंट बोर्ड), ब्रिगेडियर गिरीश उपाध्याय, डेप्युटी कमांडंट विनोद पाटील, सीईओ सुदाम मंचलवार, सतीश मनुरकर ,डॉ. राहिला शेख, अझीझ अब्बासअली, विजय रायचूरकर, निसार मुल्ला, बाशा शेख, अरफात शेख, साबीर शेख, डॉ. गौस शेख, प्रकाश मालवाई, वाहिद शेख, जावेद शेख, श्री काळे, इब्राहिम शेख, महादेव मिरजकर आदी उपस्थित होते.

धार्मिक उत्सवांच्या माध्यमातून परस्परांप्रती आदर, प्रेम आणि विश्वास वृद्धिंगत होऊ शकतो, याचे उदाहरण या उपक्रमातून पाहायला मिळाले. श्री दुर्गामाता दौडीच्या स्वागताच्या निमित्ताने जपलेली ही बंधुभावाची परंपरा बेळगावच्या सामाजिक एकोप्याचा संदेश देणारी ठरली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.