belgaum

20 लाखांची फॉर्च्युनर कार जप्त, एकावर गुन्हा

0
Mal maruti ps
 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील रामतीर्थनगर परिसरात माळमारुती पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 20 लाख रुपये किमतीची बेवारस फॉर्च्युनर कार जप्त केली. संशयास्पद हालचाली आणि वाहनाच्या कागदपत्रात विसंगती आढळून आल्याने पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या व्यक्तीचे नांव आकाश ब देसाई (रा. शहापूर, बेळगाव) असे आहे. रामतीर्थनगर येथील क्रिकेट स्टेडियम परिसरात गेल्या दि. 22 मे रोजी सायंकाळच्या 6 वाजण्याच्या सुमारास पोलीस गस्त घालत असताना त्यांना तेथे एक फॉर्च्युनर कार संशयास्पद स्थितीत आढळून आली. पोलिसांनी तात्काळ वाहनाची चौकशी सुरू केली असता वाहनाबाबत समाधानकारक माहिती मिळाली नाही. त्यामुळे पोलिसांनी ती कार जप्त करून पुढील तपास सुरू केला.

तपासाअंती शहापूरच्या आकाश देसाई याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेली टोयोटा फॉर्च्युनर कार (क्र. टीएन 31 सीएक्स 3737) अंदाजे 20 लाख रुपये किमतीची असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

 belgaum

याप्रकरणी माळमारुती पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिते अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस उपनिरीक्षक पी. एम. मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. वाहन नेमके कोणाच्या मालकीचे आहे? ते कुठून आणण्यात आले? आणि त्यामागे आणखी कांही काळबेर आहे का? याचा पोलिस शोध घेत आहेत.

टीएन (तमिळनाडू) पासिंग कार शहरातील शुकशुकाट असलेल्या ठिकाणी असल्याने पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.