belgaum

विविध चोरीच्या प्रकरणांतील १० खतरनाक चोर जेरबंद

0
Police logo
 belgaum

बेळगाव लाईव्ह : खानापूर तालुक्यासह परिसरात घडलेल्या विविध चोरी, घरफोडी आणि दरोड्याच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या दहा खतरनाक चोरांना खानापूर पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, चौकशीतून आणखी अनेक धक्कादायक गुन्हे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सोमवारी रात्री सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली. खानापूरचे डीवायएसपी वीरय्या हिरेमठ आणि पोलीस निरीक्षक लालसाब गवंडी यांच्या नेतृत्वाखाली या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.
गेल्या काही वर्षांपासून खानापूर शहरासह ग्रामीण भागात घरफोड्या, चोऱ्या आणि दरोड्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. या पार्श्वभूमीवर खानापूर पोलिसांनी गुप्तपणे तपास सुरू ठेवला होता. काही दिवसांपूर्वी दाखल झालेल्या दरोड्याच्या तक्रारीनंतर तपासाला वेग देत पोलिसांनी तीन विशेष पथके तयार केली होती.
ही पथके बेळगाव, महाराष्ट्र आणि गोवा येथे जाऊन तपास करत होती. तपासादरम्यान अनेक महत्त्वाचे सुगावे मिळाल्यानंतर संशयितांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान आरोपींनी अनेक घरफोड्या आणि दरोड्याच्या गुन्ह्यांची कबुली दिल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली

.रबियुल रोहूल अमीन गाजी (वय २९)** – मूळ राहणार: बराहीपूर, दक्षिण २४ परगणा, पश्चिम बंगाल (सध्या राहणार: दाणे गल्ली, शहापूर, बेळगाव).

  • अलीहुसेन कबीरुद्दीन मंडल (वय २७) – मूळ राहणार: माधवपूर, तारकेश्वर हुगळी, पश्चिम बंगाल (सध्या राहणार: भारतनगर, खासबाग, बेळगाव).
  • सादिक अब्दुल रहमान तोरगल (वय ३७) – राहणार: अळवण गल्ली, शहापूर, बेळगाव.
  • विवेक चंद्रकांत पाटील (वय ३३) – राहणार: महाद्वार रोड, तांगडी गल्ली, बेळगाव.
  • प्रशांत महादेव चव्हाण (वय ३७) – राहणार: कपिलेश्वर रोड, तांगडी गल्ली, बेळगाव.
  • नितिन राजाराम चव्हाण (वय ३६) – राहणार: गायत्रीनगर, खासबाग, बेळगाव.
  • दिगंबर नागेश पाटील (वय २६) – राहणार: शिवशक्तीनगर, अनगोळ, बेळगाव.
  • मयूर राजू घाडी (वय २६) – राहणार: बसवाण गल्ली, शहापूर, बेळगाव.

पोलिसांनी आरोपींकडून दरोड्यासाठी वापरलेले पिस्तूल, सोन्याचे दागिने आणि इतर साहित्य जप्त केले आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास अत्यंत गुप्त पद्धतीने सुरू असून, चौकशीतून आणखी अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 belgaum

या सर्वांसह इतर दोघांना अटक करण्यात आली आहे. सर्व आरोपींविरुद्ध खानापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.