बेळगाव लाईव्ह: राज्य काँग्रेस सरकारच्या एसआयआर विरोधी धोरणां विरोधात भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल बेनके यांनी बंगळूरु येथील पक्षाच्या राज्य कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला.
एसआयआर फॉर्म ७ च्या मुद्द्यावरून राजकीय द्वेषापोटी काँग्रेस सरकारने बेळगाव उत्तर मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांवर एफआयआर दाखल केला होता. याप्रकरणी उच्च न्यायालयाने काँग्रेस सरकारला तीव्र शब्दांत फटकारत एफआयआरला स्थगिती दिली आहे, अशी माहिती अनिल बेनके यांनी दिली.
कायमस्वरूपी प्रमाणपत्रे जारी करण्याचे अधिकार ग्रामपंचायत विकास अधिकाऱ्यांना (पीडीओ) देणे हा अत्यंत चुकीचा निर्णय आहे. या निर्णयामुळे पीडीओंवर प्रचंड दडपशाही केली जात असून, बीएलओ प्रामाणिकपणे काम करत आहेत, असे बेनके यांनी स्पष्ट केले.
बेकायदेशीर स्थानिक किंवा घुसखोरांना बाहेर घालवून लावेपर्यंत भाजप शांत बसणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी या पत्रकार परिषदेतून दिला.
भाजप राज्य कार्यालय ‘जगन्नाथ भवन’ येथे आयोजित या पत्रकार परिषदेस प्रदेश सरचिटणीस पी. राजीव, प्रदेश प्रवक्त्या सुरभी होडिगेरे, नेत्या कांती शेट्टी, राघवेंद्र यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.





