belgaum

लग्नाचे आमिष, बलात्काराच्या खोट्या तक्रारींची धमकी देत खंडणी उकळण्याचा कट; महिलेला अटक

0
354
 belgaum

 belgaum

बेळगाव लाईव्ह : “पोलीस निरीक्षक तसेच मोठ्या व्यक्तींनी लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केला” अशी धमकी देत पैशांची उकळपट्टी करण्याचा कट रचणाऱ्या एका महिलेला अटक करण्यात आली असून तिच्याविरोधात रौडीशीटर उघडण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

घटप्रभा पोलीस ठाण्यात रेण्मा शंकर मुतगा या महिलेने आठ महिन्यांपूर्वी एका व्यक्तीने लग्न करून फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली होती. मॅट्रिमोनीद्वारे ओळख झालेल्या आणि तुमकूर येथील खासगी शाळेत काम करणाऱ्या कल्याण नावाच्या व्यक्तीने लग्न करून फसवणूक केल्याचा आरोप तिने केला होता.

मात्र, या प्रकरणात संशय निर्माण झाल्यानंतर संबंधित पोलीस निरीक्षकांना दोन वेगवेगळ्या व्हॉट्सअॅप क्रमांकांवरून कॉल आणि संदेश पाठवण्यात आले. “मी एक लाख रुपये दिले आहेत, तरी माझे काम का होत नाही?” असे संदेश पाठवून दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, असे एसपी रामराजन यांनी सांगितले.

 belgaum

यानंतर संबंधित महिलेला चौकशीसाठी बोलावण्यात आले. तिच्या मोबाईलचा फॉरेन्सिक अहवाल मागवण्यात आला असता ती खोटी माहिती देत असल्याचे स्पष्ट झाले. तसेच शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये याच पद्धतीने तिने अनेक तक्रारी दिल्याचे समोर आले.

बैलहोंगल डीवायएसपी वीरय्या हिरेमठ यांच्या नेतृत्वाखाली तपास करण्यात आला असता, अशाच प्रकारची पाच प्रकरणे विविध ठिकाणी दाखल केल्याचे उघड झाले.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार :

  • २०१२ मध्ये कुडची पोलीस ठाण्यात शेजाऱ्याने लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याची तक्रार,
  • २०२२ मध्ये घटप्रभा येथे नागराज नावाच्या पोलीस कर्मचाऱ्याविरोधात तक्रार,
  • २०२३ मध्ये गजेंद्रगड येथे आकाश नावाच्या व्यक्तीवर बलात्काराचा आरोप,
  • तसेच २०२५ मध्ये कॅम्प पोलीस ठाणे आणि धारवाड उपनगर पोलीस ठाण्यात सुरेश नावाच्या व्यक्तीविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली होती.

याशिवाय एका पोलीस निरीक्षकाविरोधातही तिने गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.

“ही महिला एकटी नसून तिच्यामागे आणखी काही लोकांचे जाळे असण्याची शक्यता आहे. तिला मदत करणाऱ्यांचाही तपास करून कठोर कारवाई केली जाईल,” असा इशारा एसपी के. रामराजन यांनी दिला.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.