belgaum

जून अखेर बेळगावमार्गे  बेंगलोर-मुंबई सुपरफास्ट रेल्वे सुरू?

0
218
 belgaum


बेळगाव लाईव्ह :बहुप्रतिक्षित बेळगावमार्गे बेंगलोर-मुंबई सुपरफास्ट रेल्वे जून अखेरपर्यंत सुरू होण्याची शक्यता असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केली आहे.


नवी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतल्यानंतर माहिती देताना मंत्री जोशी यांनी सांगितले की, बेंगलोरला मुंबईशी जोडणाऱ्या नवीन सुपरफास्ट रेल्वे सेवेला हिरवा कंदील मिळाला असून ही रेल्वे बेळगावसह मध्य आणि उत्तर कर्नाटकातील प्रमुख शहरांमधून धावेल.

जोशी यांनी शेअर केलेल्या पोस्टनुसार, ही रेल्वे बेंगलोर ते मुंबई व्हाया तुमकूरु, दावणगेरे, हावेरी, हुबळी-धारवाड व बेळगाव मार्गे प्रवास करेल. मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या या घोषणेला विशेष महत्त्व आहे. कारण बेंगलोर आणि मुंबई दरम्यानची प्रस्तावित वंदे भारत स्लीपर रेल्वे बेळगावमधून जाईल अशी वाढती अटकळ आणि सार्वजनिक अपेक्षा होती.

तथापि आता हे स्पष्ट होत आहे की, वंदे भारत स्लीपर रेल्वे कल्याण-कर्नाटक मार्गाने जाण्याची शक्यता असली तरी, त्याऐवजी बेळगाव कॉरिडॉरसाठी ही नव्याने घोषित केलेली सुपरफास्ट रेल्वे सेवा देईल. बेळगाव आणि आसपासच्या जिल्ह्यांतील प्रवाशांसाठी विशेषतः व्यावसायिक प्रवासी, विद्यार्थी आणि कर्नाटकची राजधानी व मुंबई दरम्यान वारंवार प्रवास करणाऱ्यांसाठी संपर्काच्या (कनेक्टिव्हिटी) दृष्टीने ही एक मोठी चालना आहे.

 belgaum

भविष्यात या सुपरफास्ट रेल्वे सेवेचे वंदे भारत स्लीपरमध्ये श्रेणीवर्धन होण्याची शक्यता असल्याचे मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सुचित केले आहे. दुसरीकडे हा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडून सकारात्मक विचाराधीन असल्याचे वृत्त आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.