belgaum

बीडीसीबीएतर्फे बेळगावात 9 रोजी राज्य पातळीवरील ब्रिज स्पर्धा -2026

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह:कर्नाटक राज्य ब्रिज असोसिएशनची मान्यता आणि सहकार्याने बेळगाव जिल्हा कॉन्ट्रॅक्ट ब्रिज असोसिएशन (बीडीसीबीए) तर्फे येत्या शनिवार दि. 9 आणि रविवार दि. 10 मे 2026 रोजी ‘राज्य पातळीवरील ब्रिज स्पर्धा -2026’ आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती बीडीसीबीए अध्यक्ष एस. वाय. प्रभू यांनी दिली.

शहरात नुकत्याच आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अध्यक्ष प्रभू यांनी दिलेल्या माहितीनुसार,
खानापूर रोड टिळकवाडी येथील तिसऱ्या रेल्वे गेट नजीकच्या नेटिव्ह हॉटेलच्या सभागृहात खेळविल्या जाणाऱ्या या स्पर्धेत बेळगावसह मुंबई पुणे सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, गोवा, बेंगलोर वगैरे ठिकाणचे मातब्बर ब्रिज खेळाडू भाग घेणार आहेत.

सदर स्पर्धेसाठी करंडकांसह 1 लाख रुपयांची पारितोषिके पुरस्कृत करण्यात आली आहेत. ही पारितोषिके कर्नाटक राज्य ब्रिज असोसिएशनसह सिद्धार्थ चंदगडकर, अभिजीत भागवत व नितीन लोकूर यांनी पुरस्कृत केली आहेत. स्पर्धेचा उद्घाटन समारंभ शनिवारी सकाळी 11:30 वाजता होणार असून स्पर्धेची सांगता रविवारी सायंकाळी 5 वाजता बक्षीस वितरण समारंभाने होणार आहे.

 belgaum

तरी सदर राज्यस्तरीय ब्रिज स्पर्धेसंदर्भात इच्छुकांनी अधिक माहितीसाठी आपल्याशी (मो. क्र. 9845680553) अथवा एम. आय. हेगडे (9986012273), एन. व्ही. देशपांडे (9448578106), किंवा आर. एल. बर्वे (मो. क्र. 9448194754) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन एस. वाय. प्रभू यांनी शेवटी केले. पत्रकार परिषदेस एम. आय. हेगडे, एन. व्ही. देशपांडे आदी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.