belgaum

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मद्यविक्री बंद

0
cop borase
cop borase
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर आणि तालुक्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी २८ मे रोजी दारूविक्रीवर संपूर्ण बंदी घालण्यात आली आहे. पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी याबाबतचे अधिकृत आदेश जारी केले आहेत.

२८ मे रोजी सकाळी ६:०० ते रात्री ११:५९ वाजेपर्यंत पोलीस कमिशनर हद्दीतील सर्व मद्यविक्रीची दुकाने, बार, रेस्टॉरंट, क्लब आणि दारूचे डेपो बंद राहतील. कर्नाटक अबकारी कायदा १९६५ आणि कर्नाटक पोलीस कायद्यातील तरतुदींनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

या कालावधीत मद्यविक्री किंवा वाहतूक करताना आढळल्यास संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल आणि दुकाने सील केली जातील, असा इशारा पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिला आहे.

 belgaum

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.