belgaum

महिला वकिलाच्या घरावर गोळीबार…

0
 belgaum


बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरात धक्कादायक घटना घडली असून मंडोळी रोडवरील ॲडव्होकेट पूजा काकतकर यांच्या घरावर मध्यरात्री अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला. ही घटना काल रात्री १ ते २ वाजण्याच्या दरम्यान घडली.या घटनेने बेळगाव शहर परिसरात एकच खळबळ माजली आहे.हल्लेखोरांनी घराच्या पहिल्या मजल्याला लक्ष्य केले होते. त्यावेळी पहिल्या मजल्यावर त्यांची मुलगी संस्कृती अभ्यास करत होती. सुदैवाने ती या घटनेतून थोडक्यात बचावली. गोळी घराच्या काचेला लागून काचेवर फायरिंगचे स्पष्ट चिन्ह दिसून आले आहे.घटनेची माहिती मिळताच सुको (SUKO) पथक व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. गोळी लागलेली काच तपासासाठी एफएसएलकडे पाठवण्यात आली असून या प्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पूजा काकतकर या गेल्या १८ वर्षांपासून वकिली करत असून त्या अनेक उच्चप्रोफाइल प्रकरणांमध्ये बाजू मांडत आहेत. या हल्ल्यामागे त्या प्रकरणांचा संबंध असण्याची शक्यता पोलिसांकडून तपासली जात आहे. दरम्यान, पोलिसांनी काकतकर कुटुंबाला संरक्षण देण्याची हमी दिली असून एफएसएल अहवालाची प्रतीक्षा सुरू आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.