बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील रविवार पेठ येथे सार्वजनिक ठिकाणी मटका जुगार खेळणाऱ्या दोघा जणांना काल मार्केट पोलिसांनी अटक केली.
प्रशांत भरमा पाटील (वय 29, रा. महाद्वार रोड बेळगाव) आणि प्रतीक मोहन जाधव (वय 35, रा. कामत गल्ली बेळगाव) अशी पोलिसांनी अटक केलेले आरोपींची नावे आहेत.
हे दोघे रविवार पेठ येथे सार्वजनिक ठिकाणी लोकांचे पैसे रतन मुंबई मटका जुगारावर लावत होते. याबाबतची माहिती मार्केट पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल हावन्नवर व त्यांच्या सहकाऱ्यांनी धाड टाकून दोघांनाही ताब्यात घेतले.
तसेच त्यांच्याकडील रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले. पोलीस चौकशीत आरोपींनी जुगारात गोळा होणारे पैसे आपण आरोपी क्रमांक तीन गजानन शशिकांत गरडे (रा. कामत गल्ली बेळगाव) याच्याकडे सुपूर्द करत असल्याची माहिती दिली. त्यामुळे तीनही आरोपीविरुद्ध मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.




