belgaum

महिला विद्यालयात बाल-धमाल उन्हाळी शिबिर

0
461
 belgaum

बेळगाव लाईव्ह : महिला विद्यालय हायस्कूलमध्ये गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या बाल-धमाल उन्हाळी शिबिराची आज उत्साहपूर्ण वातावरणात सांगता झाली. सांगता समारंभात मुख्याध्यापक के. एन. पाटील, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका शुभांगी पंडित, ज्येष्ठ शिक्षिका अस्मिता देशपांडे, संपदा बनसूर, अर्चना जांबोटकर, गीता जोशी उपस्थित होत्या.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थिनींनी शिबिरातील अनुभव कथन करताना विविध उपक्रमांचा आनंद व्यक्त केला. शिक्षकांच्या वतीने माधुरी होनगेकर आणि दीपा सुखये यांनी मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापक के. एन. पाटील यांनी शिबिरातील नाविन्यपूर्ण उपक्रम आणि विद्यार्थिनींना मिळालेल्या आनंदाचा विशेष उल्लेख केला. शुभांगी पंडित यांनीही शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले.

सात दिवस चाललेल्या या शिबिरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या दिवशी रोशनी हुंद्रे यांनी नृत्य प्रशिक्षण दिले, तर दुसऱ्या दिवशी अक्षता पिळणकर यांनी अभिनयाचे मार्गदर्शन केले. तिसऱ्या दिवशी आशुतोष पाटील यांनी फेटा बांधणीचे प्रशिक्षण दिले, तसेच गौरी कंग्राळकर हिने ओढणी आणि फेटा बांधणीचे प्रात्यक्षिक दाखवले. चौथ्या दिवशी उचगाव येथील नेहाल जाधव यांच्या पथकाने लाठी प्रशिक्षण दिले. पाचव्या दिवशी ‘सर्पमित्र आपल्या भेटीला’ या उपक्रमांतर्गत आनंद चिट्टी यांनी सापांविषयी माहिती देत भीती दूर करण्याचा प्रयत्न केला. सहाव्या दिवशी श्रद्धा टीबीले यांनी हस्तकला व चित्रकलेचे प्रशिक्षण दिले.

 belgaum

सातव्या दिवशी विद्यार्थिनींनी ‘उबंटू’ हा चित्रपट पाहत आनंद घेतला तसेच स्वतः तयार केलेल्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पूजा पाटील यांनी केले.

संस्थेचे अध्यक्ष सचिन बिच्चू आणि कार्यवाह राहुल फडके यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मुख्याध्यापक के. एन. पाटील यांच्या प्रोत्साहनामुळे शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.