बेळगाव लाईव्ह: बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील मेखळी गावात एका नवविवाहित महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, मृत महिलेच्या कुटुंबीयांनी गंभीर आरोप केले आहेत.
ज्योती कांबळे (वय 23) असे मृत महिलेचे नाव आहे. तिचा विवाह तीन वर्षांपूर्वी हणमंत कांबळे यांच्याशी झाला होता. मात्र, लग्नानंतर अवघ्या तीन दिवसांतच गंडाच्या घरच्यांकडून होणाऱ्या छळामुळे तिला माहेरी आणण्यात आले होते.
सुमारे दोन वर्षांनंतर गंडाच्या घरच्यांनी पुन्हा ज्योतीला आपल्या घरी नेले. परंतु, गंडाच्या घरी गेल्यानंतर केवळ तीन दिवसांतच तिचा मृत्यू झाल्याने अनेक शंका उपस्थित होत आहेत.
मृत महिलेच्या कुटुंबीयांनी नवऱ्याच्या घरच्यांनी मारहाण करून खून केला असावा, असा गंभीर आरोप केला आहे.
या प्रकरणी रायबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
या घटनेमागील नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे.





