belgaum

कांही तालुक्यात सरासरी कमी असली तरी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस

0
Rain bgm
 belgaum

बेळगाव लाईव्ह :कर्नाटक राज्य नैसर्गिक आपत्ती निरीक्षण केंद्रच्या (केएसएनडीएमसी) आज बुधवार दि. 8 जुलै 2026 रोजी सकाळी 8:30 वाजेपर्यंतच्या अहवालानुसार बेळगाव जिल्ह्यातील नैऋत्य मोसमी पावसाची हजेरी कालच्या इतकी जोरदार नसली तरी समाधानकारक होती. गेल्या 24 तासात जिल्ह्यात खानापूर तालुक्यात सर्वाधिक 42.0 मि.मी. इतक्या सर्वाधिक पावसाची नोंद झाली असली तरी कालच्या तुलनेत आज कांही तालुक्यांमध्ये दरवर्षीच्या सरासरीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी होते.

बेळगाव जिल्ह्यामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत म्हणजे 1 जून ते 8 जुलै या कालावधीत खानापूर तालुक्यात सर्वाधिक 524.3 मि.मी. इतका पाऊस नोंदवला गेला आहे. खानापुरात पावसाची संततधार सुरू असली तरी पावसाचे हे प्रमाण दर वर्षीच्या 576.35 मि.मी. या सरासरीच्या तुलनेत 9 टक्के कमी आहे. खानापूर प्रमाणेच उपरोक्त कालावधीत बैलहोंगल (-4 टक्के) बेळगाव (-15 टक्के) आणि कागवाड (-3 टक्के) या तालुक्यांमध्ये देखील कमी पावसाची नोंद झाली आहे.

कर्नाटक राज्य नैसर्गिक आपत्ती देखरेख केंद्रानुसार बेळगाव जिल्ह्यातील गेल्या 24 तासांतील पाऊस (8 जुलै 2026 रोजी सकाळी 8:30 पर्यंत), एकूण पावसाची स्थिती (1 जुलै ते 8 जुलै 2026) आणि नैऋत्य मान्सून पावसाची स्थिती (1 जून ते 8 जुलै 2026) पुढीलप्रमाणे आहे. गेल्या 24 तासांतील पाऊस (अनुक्रमे तालुका, मिलिमीटरमध्ये सर्वसामान्य पाऊस, प्रत्यक्ष पाऊस, कमी-जास्त सरासरी टक्के यानुसार)

 belgaum

: अथणी – 2.1, 1.5, -31. बैलहोंगल – 6.2, 4.1, -34. बेळगाव – 15.7, 18.1, 15. चिक्कोडी – 5.2, 2.7, -48. गोकाक – 2.4, 1.8, -24. हुक्केरी – 7.0, 5.6, -20. खानापूर – 21.5, 42.0, 95. रामदुर्ग – 1.5, 0.1, -92. रायबाग – 1.9, 1.1, -44. सौंदत्ती – 1.7, 0.9, -48. कित्तूर – 9.1, 10.3, 13. निपाणी – 6.9, 6.3, -9. कागवाड – 2.7, 0.8, -70. मुडलगी – 2.7, 2.4, -10. येरगट्टी – 2.7, 0.8, -70. बेळगाव – 6.3, 8.7, 38.

आठवड्याभरातील एकूण पावसाची स्थिती (अनुक्रमे तालुका, मिलिमीटरमध्ये सर्वसामान्य पाऊस, प्रत्यक्ष पाऊस, कमी-जास्त सरासरी टक्के यानुसार) : अथणी – 12.2, 24.1, 97. बैलहोंगल – 44.0, 79.7, 81. बेळगाव – 107.7, 204.1, 90. चिक्कोडी – 31.0, 88.4, 185. गोकाक – 16.2, 41.6, 157. हुक्केरी – 35.9, 106.7, 197. खानापूर 195.2, 380.2, 95. रामदुर्ग – 11.4, 19.1, 67. रायबाग – 13.7, 46.2, 237. सौंदत्ती – 12.5, 32.6, 161. कित्तूर – 65.7, 121.1, 84. निपाणी – 45.1, 144.8, 221. कागवाड – 15.8, 38.9, 146. मुडलगी – 17.2, 27.9, 56. येरगट्टी – 13.6, 33.1, 143. बेळगाव – 46.2, 107.4, 132-.

Rain logo

1 जूनपासून नैऋत्य मान्सून पावसाची स्थिती (अनुक्रमे तालुका, मिलिमीटरमध्ये सर्वसामान्य पाऊस, प्रत्यक्ष पाऊस, कमी-जास्त सरासरी टक्के यानुसार) : अथणी – 93.4, 116.2, 24. बैलहोंगल 191.3, 183.7, -4. बेळगाव – 349.0, 295.3, -15. चिक्कोडी – 129.7, 194.7, 50. गोकाक – 92.9, 103.7, 12. हुक्केरी – 127.1, 208.1, 64. खानापूर – 576.3, 524.3, -9. रामदुर्ग – 84.7, 123.4, 46. रायबाग – 88.2, 141.6, 60. सौंदत्ती – 103.0, 148.1, 44. कित्तूर – 266.9, 269.6, 1. निपाणी – 204.6, 242.5, 19. कागवाड – 118.3, 115.3, -3. मुडलगी – 96.3, 111.4, 16. येरगट्टी – 99.0, 155.4, 57. बेळगाव – 192.5, 211.4, 10.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.