Home बातम्या शिवजयंती चित्ररथ महामंडळातर्फे शिवजयंती
belgaum

शिवजयंती चित्ररथ महामंडळातर्फे शिवजयंती

0
शिवजयंती चित्ररथ महामंडळातर्फे शिवजयंती
 belgaum

 belgaum

बेळगाव लाईव्ह : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज पासून संपूर्ण शहर शिवमय होणार असून, ढोल-ताशांच्या गजरात, भगव्या पताकांनी सजलेल्या रस्त्यांवर आणि “जय जिजाऊ, जय शिवराय”, “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले.

छत्रपती शिवाजी उद्यान येथे आज सकाळी ६ वाजता शिवजयंती चित्ररथ महामंडळातर्फे विधीपूर्वक पूजनाचा कार्यक्रम पार पडला. अग्रभागी तेजोमय शिवज्योत आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मूर्ती हे या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले.

महाराजांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक व जलाभिषेक भाजप नेते डॉ. रवी पाटील तसेच अध्यक्ष सुनील जाधव यांच्या हस्ते करण्यात आले, त्यानंतर सामूहिक आरती व प्रसाद वाटपाचा कार्यक्रम झाला.

दरम्यान, विविध दुर्गांवरून आणण्यात आलेली पवित्र शिवज्योत शहरात दाखल झाली असून, मावळ्यांच्या आगमनाने वातावरणात अधिकच उत्साह संचारला आहे. त्यांच्या स्वागतासाठी शिवभक्तांनी मोठी गर्दी केली होती.

शिवजयंतीनिमित्त सादर होणारे चित्ररथ व सजीव देखावे यासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली असून, हे देखावे भव्य-दिव्य स्वरूपात सादर होणार आहेत. मिरवणूक शांततेत व शिस्तीत पार पाडावी, असे आवाहन अध्यक्ष सुनील जाधव यांनी केले.

सरचिटणीस जे. बी. शहापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श युवकांनी अंगीकारावा, असे प्रतिपादन केले आहे.
यावेळी उपस्थित शिवजयंती चित्ररथ महामंडळाचे अध्यक्ष सुनील जाधव सरचिटणीस जे बी शहपूरकर,प्रसाद पाटील विनायक बावडेकर अरुण पाटील संजय नाईक मारुती पाटील,विजय कुंटे भूषण पाटील, राम कुलकर्णी उमेश शिदोलकर यासह शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.