बेळगाव लाईव्ह :मच्छे आणि झाडशहापूर येथे सार्वजनिक ठिकाणी अंमली पदार्थ गांजाच्या नशेत विचित्र वर्तन करणाऱ्या दोघा जणांना बेळगाव ग्रामीण पोलिसांनी काल ताब्यात घेतले.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे सजल सुधांशू मैती (वय 55, मूळचा पश्चिम बंगाल सध्या रा. कमलनगर बेळगाव) आणि राजू रामचंद्र देसाई (वय 19, रा. शिवाजीनगर, झाडशहापूर) बेळगाव अशी आहेत.
यापैकी सजल हा मच्छे गावात, तर राजू हा झाडशहापूर येथे सार्वजनिक ठिकाणी विचित्र वर्तन करत असताना बेळगाव ग्रामीण पोलिसांना आढळून आला.
पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असता त्यांनी कोणती तरी नशा केल्याचे आढळून आले. त्यासाठी त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असता दोघाही आरोपींनी गांजा या अंमली पदार्थाचे सेवन केल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.





