Home बातम्या घरात दडवलेले 2.60 लाखांचे हेरॉईन जप्त; दोघांना अटक
belgaum

घरात दडवलेले 2.60 लाखांचे हेरॉईन जप्त; दोघांना अटक

0
घरात दडवलेले 2.60 लाखांचे हेरॉईन जप्त; दोघांना अटक
Kakati police station
 belgaum

 belgaum

बेळगाव लाईव्ह :सुळगा येथील आपल्या घरामध्ये हेरॉईन या अंमली पदार्थाचा साठा करून त्याची विक्री करणाऱ्या दोघा जणांना बेळगाव शहर सीसीबी पोलिसांनी काल शनिवारी अटक करून त्यांच्या जवळील 2 लाख 60 हजार रुपये किंमतीचे हेरॉईन जप्त केले.

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे नागेश मधुकर भगत (वय 35, रा. सावंतवाडी सध्या देशपांडे गल्ली, सुळगा) आणि राहुल ज्योतिबा जाधव (वय 33,रा. कंग्राळी खुर्द, सध्या देशपांडे गल्ली, सुळगा) अशी आहेत.

सुळगा येथील एका घरामध्ये अंमली पदार्थाचा साठा करून त्याची विक्री केली जात असल्याची विश्वसनीय माहिती मिळताच सीसीबी बेळगावचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ भजंत्री व त्यांच्या सहकाऱ्यांनी काल संबंधित घरावर धाड टाकली.

Police logo

या धाडीत पोलिसांनी आपल्या पोलीस श्वान पथकाच्या मदतीने आरोपींनी घरात दडवून ठेवलेले सुमारे 2 लाख 60 हजार रुपये किमतीचे 12.92 ग्रॅम इतके 119 पुड्यांमध्ये बांधून ठेवलेले हेरॉईन शोधून काढले. त्या हेरॉईनसह पोलिसांनी दोन मोटरसायकली जप्त केल्या.

यावेळी पोलीस चौकशीत उपरोक्त दोन्ही आरोपींनी अंमली पदार्थ विक्रीचा गुन्हा कबूल केला. तसेच जप्त केलेले हेरॉईन आपण कोळीवाडा मुंबई येथील संतोष याच्याकडून आणले असल्याची माहिती दिली. त्यामुळे त्या तिघा जणांविरुद्ध काकती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.