Home बातम्या यकृताचे आरोग्यः निरोगी जीवनाची गुरुकिल्ली
belgaum

यकृताचे आरोग्यः निरोगी जीवनाची गुरुकिल्ली

0
यकृताचे आरोग्यः निरोगी जीवनाची गुरुकिल्ली
 belgaum

 belgaum

बेळगाव लाईव्ह :यकृत (लिवर) हे मानवी शरीरातील अत्यंत महत्वाचे अवयव असून आपल्या एकूण आरोग्याच्या देखमालीत ते मोठी भूमिका बजावते. पित्त तयार करून पचनवि येला मदत करणे, रक्तातील साखर आणि कोलेस्टेरॉलचे संतुलन राखणे, आवश्यक पोषक तत्त्वांचे साठवण करणे यासह ५०० हून अधिक महत्त्वपूर्ण कार्य यकृत पार पाडते. त्यामुळे संतुलित आणि आरोग्यदायी आहार घेतल्यास यकृताचे आरोग्य चांगले राखता येते. अरिहंत हॉस्पिटलमधील पोटविकार (गॅस्ट्रोएंट्रोलॉजी) विभाग डॉ. वरदराज गोकाक पांच्या नेतृत्वाखाली व डॉ. गोविंद कोष्पद यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे. त्यांच्या कुशल व योग्य उपचाराने रुग्णांना लाभहोत असून हजारो रुग्णांबर ते यशस्वी उपचार करून नवजीवन दिले आहे.

निरोगी जीवनासाठी यकृत निरोगी असणे अत्यावश्यक आहे. मात्र अति मद्यपान, निष्क्रिय जीवनशैली, लठ्ठपणा, अयोग्य आहारपद्धती आणि काही विषाणूजन्य संसर्ग पामुळे यकृताला गंभीर इजा होऊ शकते. परिणामी फैटी लिव्हर, हिपॅटायटिस, सिरोसिस किंवा लिव्हर कॅन्सरसारख्या गभीर आजारांचा चोका वाढतो बासाठी आपण निरोगी जीवन हीच गुरुकिल्ली पाप्रमाणे आपले यकृत निरोगी ठेवणे आवश्यक आहे. यासाठी आपण व्यसनापासून दूर राहून सकस आहार घेणे गरजेचे आहे.

यकृताचे सामान्य आजार

१. हिपॅटायटिस बी आणि सी

हे विषाणूजन्य आजार असून यकृतावर गंभीर परिणाम करतात. योग्य उपचार न घेतल्यास है दीर्घकालीन आजार, सिरोसिस किंवा कॅन्सरमध्ये परिवर्तीत होऊ शकतात. हिपॅटायटिस बीसाठी लस उपलब्ध आहे. तर हिपॅटायटिस सीसाठी अँटिव्हायरल उपचार केले जातात.

२. फैटी लिव्हर (चरबीयुक्त यकृत)

नॉन-अल्कोहोलिक फैटी लिव्हरः लठ्ठपणा, मधुमेह आणि निष्क्रिय

जीवनशैलीमुळे होतो.

अल्कोहोलिक फैटी लिव्हरः अति मद्यपानामुळे होतो आणि पुढे जाऊन

सिरोसिसमध्ये रुपांतर होऊ शकतो.

३. लिव्हर सिरोसिस

दीर्घकाळ मद्यपान, हिपॅटायटिस किंवा फैटी लिव्करमुळे यकृताच्या पेशींचे नुकसान होऊन हा आजार होतो. गंभीर अवस्थेत पकृत निकामी होण्याची शक्यता असते.

४. लिव्हर कर्करोग (कॅन्सर)

बहुतेक वेळा सिरोसिस किंवा दीर्घकालीन हिपॅटायटिस बी/सी संसर्गामुळे होतो

५. विल्सन रोग आणि हेमोक्रोमॅटोसिसः

हे दुर्मिळ आनुवंशिक आजार असून शरीरात तांचे किंवा लोह साचल्यामुळे

यकृताच्या कार्यावर परिणाम होती.

रोग ओळख अन् तपासणी

मधुमेह, लङ्कपणा किंवा यकृताच्या आजारांचा इतिहास असलेल्या व्यक्तींनी नियमित तपासणी करणे आवश्यक आहे. विशेषतः हिपॅटायटिस बी आणि सीचे लवकर निदान झाल्यास उपचार सोपे होतात आणि गंभीर परिणाम टाळता येतात.

पकृतात्चे संरक्षण कसे करावे?

यकृताचे आरोग्य टिकविण्यासाठी जीवनशैलीत बदल करणे अत्यंत गरजेचे आहे.

कमी चरबीयुक्त संतुलित आहार घेणे

भरपूर फळे, भाज्या, धान्ये आणि प्रथिने यांचा समावेश करणे

  • नियमित व्यायाम करणे

वजन नियंत्रणात ठेवणे आवश्यक

मद्यपान टाळणे गरजेचे

मधुमेह आणि इतर आजारांवर नियंत्रण ठेवावे

निष्कर्ष

यकृताचे आरोग्य हे आपल्या एकूण आरोग्याचा पाया आहे. दरवर्षी साजरा होणारा ‘जागतिक यकृत दिन’ आपल्याला याची जाणीव करून देतो की, यकृताकडे दुर्लक्ष करणे चौकादायक ठरू शकते, विशेषतः आजच्या बदलत्या जीवनशैलीत, नियमित तपासणी, योग्य आहार, व्यायाम आणि वाईट सवयीचा त्याग करून आपण यकृत निरोगी ठेवू शकतो. एकंदरीत निरोगी यकृत म्हणजे निरोगी जीवन आणि ते आपल्या हातात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.