बेळगाव लाईव्ह :गॅस सिलेंडरच्या सध्याच्या वाढत्या किमतीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा देताना ओम साई इंडस्ट्रीजच्या कलाश्रीबंब अँड स्टील फर्निचर या फर्मने लाकूड आणि कोळशावर चालणाऱ्या विशेष डिझाइन केलेल्या कलाश्री लाकूड-कोळसा जैवइंधनावर चालणाऱ्या शेगड्या बाजारात आणल्या असून गॅस टंचाईवर परिणामकारक असल्यामुळे सद्य परिस्थितीत त्या वेगाने लोकप्रिय होऊ लागल्या आहेत.
ओम साई इंडस्ट्रीज कलाश्री बंब आणि स्टील फर्निचर सादर केले आहेत गॅस पासून चिंतामुक्त करणारे कलाश्री लाकूड-कोळसा जैवइंधनावर चालणारे स्टोव्ह जे विशेषतः घरगुती वापरासाठी, मिनी हॉटेल्स, हॉस्टेल्स, मेस केटरिंग सेवा आणि मोठ्या स्वयंपाकाच्या गरजांसाठी डिझाइन केलेले आहेत.
कलाश्रीच्या या वैशिष्ट्यपूर्ण स्टोव्हपैकी 1 किलोचा चार्ज करण्यायोग्य स्टोव्ह जो घरगुती लाकडी कोळसा आणि जैवइंधनावरही चालतो. 2 किलोचा स्टोव्ह 25 ते 100 लोकांच्या स्वयंपाकासाठी वापरला जातो. 3 किलोचा स्टोव्ह 100 ते 200 लोकांच्या स्वयंपाकासाठी, तर 4 किलोचा स्टोव्ह 200 ते 500 लोकांच्या स्वयंपाकासाठी वापरता येतो.
ज्वाला नियंत्रित करणारी प्रणाली, मजबूत आणि टिकाऊ रचना, किफायतशीर आणि कार्यक्षम स्वयंपाक, गॅसची 85 टक्के कमी बचत, स्वयंपाकाच्या वेळेत 50 टक्के कपात, 90 टक्के धूर विरहित आणि 100 टक्के नैसर्गिक रुचकर चविष्ट स्वयंपाक ही या स्टोव्हची वैशिष्ट्ये आहेत. विश्वासार्हतेसाठी खरेदीपूर्वी ग्राहकांसमोर स्टोव्ह प्रज्वलनाचे प्रात्यक्षिकही सादर केले जाते ही महत्त्वाची बाब आहे.

कलाश्रीचे लाकूड-कोळसा जैवइंधनावर चालणारे स्टोव्ह खरेदी करणाऱ्या जेमिस कॉटेज कोलवा बीच गोवा, कांची कॅफे गोवा, उडपी हॉटेल महावीरनगर, स्वागत हॉटेल ब्रह्मनगर, बसवेश्वर मेस सांबरा वगैरे ग्राहकांनी कलाश्रीच्या वैशिष्ट्यपूर्ण स्टोव्हची प्रशंसा करून पोचपावती दिली आहे.
एकंदर गॅस दरवाढीच्या काळात कलाश्रीच्या वैशिष्ट्यपूर्ण स्टोव्हचा पर्याय परिणामकारक सोयीचा ठरत असून सध्या हे स्टोव्ह खानापूर रोड, उद्यमबाग, बेळगाव येथील शगुन गार्डन समोरील कलाश्री टॉवर या ठिकाणी, तसेच ओम साई इंडस्ट्रीजच्या डीलर्सकडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तरी अधिक माहितीसाठी इच्छुकांनी 9900361861 किंवा 9480017217 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.





