belgaum

श्री बसव जयंतीनिमित्त उद्या शहरातील वाहतूक मार्गात ‘असा’ बदल

0
446
Diversion
 belgaum

बेळगाव लाईव्ह :विश्वगुरू श्री बसवेश्वर जयंती उत्सवानिमित्त उद्या रविवार दि. 26 एप्रिल 2026 रोजी शहरात काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीप्रसंगी सार्वजनिकांना अनुकूल व्हावे यासाठी नेहमीच्या वाहतूक मार्गांमध्ये बदल करण्यात आला असून याची नोंद नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन शहर पोलीस आयुक्तांनी केले आहे.

श्री बसवेश्वर जयंती उत्सव निमित्त उद्या रविवारी बेळगाव शहरात भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल येथून सुरू होणाऱ्या या मिरवणुकीची काकती वेस रोड, शनिवार खूट, गणपत गल्ली, मारुती गल्ली, किर्लोस्कर रोड, धर्मवीर संभाजी चौक, कॉलेज रोड मार्गे लिंगराज कॉलेज मैदानावर सांगता होणार आहे.

त्यामुळे वाहतूक सुरळीत राहून सार्वजनिकांना अनुकूल व्हावे यासाठी उद्या रविवारी 26 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजल्यापासून मिरवणूक संपेपर्यंत शहरातील वाहतूक मार्गांमध्ये खालील प्रमाणे बदल करण्यात आला आहे. तरी नागरिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस आयुक्तांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

 belgaum

1) किल्ला तलाव अशोक सर्कल, आरटीओ सर्कल, चन्नम्मा सर्कल, कॉलेज रोड मार्गे खानापूरच्या दिशेने जाणारी वाहने संगोळी रायण्णा चौकातून एस.पी. ऑफिस रोड मार्गे कृष्ण देवराज (कोल्हापूर कत्री) सर्कल वाय -जंक्शन, सदाशिवनगर लक्ष्मी कॉम्प्लेक्स, विश्वेश्वरय्यानगर, गांधी सर्कल, शौर्य चौक (मिलिटरी हॉस्पिटल सर्कल), केंद्रीय विद्यालय नं. 2, शर्कत पार्क, ग्लोब थिएटर सर्कल मार्गे खानापूर रोड वरून पुढे मार्गस्थ.

2) खानापूरकडून काँग्रेस रोड मार्गे बेळगाव शहरात प्रवेश करणारी आणि रेल्वे ओव्हर ब्रिज वरून शहराकडे जाणारी वाहने गोगटे सर्कल, ग्लाब थिएटर सर्कल येथून गवळी गल्ली क्रॉस कॅम्प, शरकत पार्क, केंद्रीय विद्यालय नं. 2, शौर्य चौक, गांधी सर्कल (अरगन तलाव), श्री गणेश मंदिर, हिंडलगा रोड, हनुमाननगर डबल रोड मार्गे बॉक्साइट रोड वरून राष्ट्रीय महामार्गाकडे प्रस्थान.

3) सार्वजनिकांच्या सोयीसाठी मिरवणूक मार्गावरील ज्या रस्त्यांवर दुहेरी वाहतूक असेल त्या रस्त्यावर एकेरी आणि ज्या रस्त्यावर एकेरी वाहतूक असेल तो खुला ठेवला जाईल. 4) उद्या रविवारी 26 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजल्यापासून मिरवणूक संपेपर्यंत सर्व दिशांकडून अवजड वाहनांना शहरात प्रवेश बंदी असेल.

5) राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल ते काकती वेस रोड, शनिवार खूट, गणपत गल्ली, मारुती गल्ली, किर्लोस्कर रोड, धर्मवीर संभाजी चौक, कॉलेज रोड, लिंगराज कॉलेज रोड या मिरवणूक मार्गावर उद्या रविवारी 26 एप्रिल रोजी सायंकाळी 4 नंतर मिरवणूक संपेपर्यंत कोणत्याही प्रकारची वाहने पार्क करण्यास अथवा थांबवण्यास बंदी असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.