belgaum

केळकर बाग येथील ‘या’ खचलेल्या रस्त्याकडे लक्ष देण्याची मागणी

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह :एल अँड टी कंपनीच्या बेजबाबदार कामामुळे बेळगाव शहरातील केळकर बाग, दत्त मंदिरासमोरील खचलेला रस्ता अपघाताला निमंत्रण देणारा ठरत असल्यामुळे या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी केली जात आहे.

शहरातील केळकर बाग येथील दत्त मंदिरासमोरील समादेवी गल्लीला जोडणाऱ्या रस्त्याच्या ठिकाणी एल अँड टी कंपनीने जलवाहिनी दुरुस्तीच्या कारणास्तव काही दिवसांपूर्वी खोदकाम केले होते. मात्र काम झाल्यानंतर सदर रस्ता व्यवस्थित मजबूत बुजवण्यात न आल्यामुळे सध्या दोन ठिकाणी हा रस्ता खचून मोठे खड्डे पडले आहेत.

खचलेला हा रस्ता वहिवाटीस त्रासदायक, तसेच या मार्गाचा वापर करणाऱ्या दुचाकी वाहनांसाठी विशेष करून रात्रीच्या वेळी अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे.

 belgaum

तरी स्थानिक नगरसेवकांसह संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन खचलेल्या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी केली जात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.