belgaum

एसएसएलसी परीक्षेत बागलकोट जिल्ह्याची बाजी

0
188
 belgaum

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ चा एसएसएलसी परीक्षा-१ चा जिल्हावार निकाल जाहीर केला असून, राज्याचा सरासरी निकाल ९४.१ टक्के इतका लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत अनेक जिल्ह्यांनी निकालात लक्षणीय सुधारणा केली असून शैक्षणिक प्रगतीचा आलेख उंचावलेला दिसत आहे.

निकालाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, दक्षिण कन्नड जिल्ह्याने ९८.४ टक्के आणि उत्तर कन्नड जिल्ह्याने ९८.१८ टक्के निकाल मिळवून राज्यात आपले वर्चस्व कायम राखले आहे. बागलकोट जिल्ह्यानेही ९५.४ टक्के निकालासह उत्कृष्ट कामगिरी केली असून एकूण ३०,१११ विद्यार्थ्यांपैकी २८,७३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

बेळगाव जिल्ह्यातील निकालाचा विचार करता, ३०,५६० विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी २८,९५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून जिल्ह्याचा निकाल ९४.७५ टक्के लागला आहे. तसेच चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यातून ४१,५०० विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी ३९,०४७ विद्यार्थी यशस्वी झाले असून चिक्कोडीचा निकाल ९४.०९ टक्के इतका नोंदवला गेला आहे.

राज्याची राजधानी असलेल्या बेंगळुरूमध्येही निकालाची टक्केवारी समाधानकारक असून बेंगळुरू उत्तर विभागाने ९५.३३ टक्के, तर बेंगळुरू ग्रामीण विभागाने ९५.८३ टक्के निकाल मिळवला आहे.

विजापूर जिल्ह्याने ९४.१६ टक्के आणि बळ्ळारी जिल्ह्याने ९४.३८ टक्के गुणांसह यशस्वी वाटचाल केली आहे. राज्यातील एकूण ७,७०,२०० विद्यार्थ्यांपैकी ७,२४,७९४ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन पुढील शिक्षणासाठी पात्र ठरले आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.