belgaum

विकास कामाच्या नावाखाली मंडोळी रोडची पुन्हा वाताहत

0
167
 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील पहिला स्मार्ट सिटी रस्ता म्हणून मंजूर झालेला मंडोळी रोड हा रस्ता तब्बल 6 वर्षानंतर जवळपास पूर्ण झाला असतानाच पुन्हा एकदा तो खोदण्याचे काम सुरू करण्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

बेळगाव शहरातील पहिला स्मार्ट सिटी रस्ता म्हणून मंजूर झालेला मंडोळी रोड सध्या नागरिकांच्या नाराजीचा विषय ठरला आहे.

सदर रस्त्याचा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी तब्बल 6 वर्षांपेक्षा अधिक काळ लागला आहे. इतक्या काळानंतरही या रस्त्याचे काम समाधानकारक झाले नसल्याची नागरिकाची तक्रार आहे.

आता हा रस्ता जवळपास पूर्ण झाला असतानाच पुन्हा एकदा तो खोदण्याचे काम सुरू करण्यात आले आहे, यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. हा स्मार्ट सिटी प्रकल्प असेल तर वीज केबल, गॅस पाइपलाइन आणि पाणी जोडणी यांसारख्या सुविधांचे आधीच नियोजन करून त्यांची पूर्तता का करण्यात आली नाही? असा नागरिकांचा सवाल आहे. योग्य नियोजनाअभावी नव्याने बनवलेला रस्ता पुन्हा उखडण्यात येत आहे ज्यामुळे सार्वजनिक पैशांचा अपव्यय होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

तसेच बाजूला बसवलेले पेव्हर्स न काढता पाइपलाइन टाकण्यासाठी रस्ता खोदला जात आहे, यावरही नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. खोदकामामुळे चौगुलेवाडीच्या ठिकाणी रस्ता बंद होऊन रहिवाशांची मोठी गैरसोय होत आहे.

मंडोळी रोड येथील एकंदर परिस्थिती पाहता नागरिकांकडून प्रशासनाकडे जबाबदारी निश्चित करण्याची आणि भविष्यात अशा चुका टाळण्यासाठी योग्य नियोजन करण्याची मागणी केली जात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.