बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहर शैक्षणिक विभागाने एसएसएलसी परीक्षेची गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली असून, यामध्ये साक्षी पालणकर आणि संजोता व्हावळ यांनी ९९.२० टक्क्यांसह शहरात अव्वल क्रमांक पटकावला आहे.
सेंट जोसेफ हायस्कूलची साक्षी पालणकर आणि सेंट मेरीज हायस्कूलची संजोता व्हावळ यांनी ६२० गुण मिळवून प्रथम स्थान मिळवले असून, केएलएस हायस्कूलची स्नेहल रेवणकर ९९.०४ टक्क्यांसह द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली आहे.
केएसईएबीने यंदाच्या एसएसएलसी अर्थात दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केल्यानंतर बेळगाव शहर गटशिक्षण कार्यालयाने शहरातील प्रत्येक माध्यमिक शाळेमध्ये सर्वाधिक गुण घेऊन प्रथम आलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींची यादी जाहीर केली आहे. आपापल्या शाळांमध्ये प्रथम आलेल्या या मुला -मुलींमध्ये सेंट जोसेफ कॉन्व्हेंट हायस्कूलची साक्षी गणपती पालनकर आणि सेंट मेरीज हायस्कूलची विद्यार्थिनी संजोता पांडुरंग हावळ या दोघी सर्वाधिक प्रत्येकी 620 गुण (99.2 टक्के) मिळवून बेळगाव शहरात अग्रस्थानी आहेत. त्यांच्या मागोमाग केएलएस इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या स्नेहल प्रशांत रेवणकर 619 गुण (99.04 टक्के) आणि स्वास्ती अरुण रबज्जनावर 618 गुण (98.88 टक्के) यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला आहे. विशेष म्हणजे बेळगाव शहरांमधील पहिल्या 15 क्रमांकांने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थी ‘विद्यार्थिनींमध्ये फक्त एक मुलगा असून उर्वरित सर्व मुली आहेत.
बेळगाव शहर गटशिक्षण कार्यालयाने जाहीर केलेल्या यादीनुसार शहरातील माध्यमिक शाळेमध्ये सर्वाधिक गुण घेऊन शहरात पहिल्या 16 क्रमांकामध्ये आलेल्या विद्यार्थी -विद्यार्थिनींची नावे पुढील प्रमाणे आहेत. 1) साक्षी गणपती पालनकर सेंट जोसेफ कॉन्व्हेंट हायस्कूल -620 गुण (99.2 टक्के), 2) संजोता पांडुरंग हावळ सेंट मेरीज हायस्कूल -620 (99.2), 3) स्नेहल प्रशांत रेवणकर केएलएस इंग्लिश मीडियम हायस्कूल -619 (99.04), 4) स्वास्ती अरुण रबज्जनावर केएलएस इंग्लिश मीडियम हायस्कूल -618 (98.88), 5) अनुषा बसवराज कन्नाल श्रीमती उषाताई गोगटे गर्ल्स हायस्कूल -617 (98.72), 6),

6) धनश्री आनंद बागी अल्पसंख्यांक मोरारजी देसाई निवासी शाळा -617 (98.72), 7) श्रीपद्मा आनंद अथणी डिव्हाइन प्रॉव्हिडन्स हायस्कूल -616 (98.56), 8) प्रथम श्रीशैल पाटील सेंट मेरीज हायस्कूल -616 (98.56), 9) झारा अब्दुल मजीद मुजावर सेंट मेरीज हायस्कूल -616 (98.56), 10) साईशा देसाई सेंट झेवियर हायस्कूल -616 (98.56), 11) जानवी प्रवीण रायकर गव्हर्मेंट सरस्वती गर्ल्स पीयुसी कॉलेज -615 (98.4), 12) स्नेहा यल्लाप्पा हिरोजी मराठी विद्यानिकेतन -615 (98.4),
13) श्रेया मंजुनाथ गोलीहळ्ळी जी. जी. चिटणीस इंग्लिश मीडियम हायस्कूल -615 (98.4), 14) समन्विता शिवानंद मरबशेट्टी गव्हर्मेंट कंपोझिट हायस्कूल -615 (98.4), 15) आदिती आनंद गुडनावर केएलएस इंग्लिश मीडियम हायस्कूल -615 (98.4), 16) मुग्धा रमेश गोडसे केएलएस इंग्लिश मीडियम हायस्कूल -615 गुण (98.4 टक्के).




