Thursday, October 10, 2024

/

प्रशासनाच्यावतीने महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंतीचे आचरण

 belgaum

बेळगाव लाईव्ह : जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत महानगर पालिका, बेळगाव आणि माहिती व जनसंपर्क विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील वीरसौध येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या औचित्याने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. विविध मान्यवर आणि अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना आमदार असिफ सेठ म्हणाले, महात्मा गांधींनी स्वराज्य, अहिंसा या तत्वातून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. गांधीजींचे जीवन हा संदेश असून, त्यांच्या चरित्राचा अभ्यास करून आजच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन समाजातील चांगले नागरिक बनले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

ते पुढे म्हणाले, ज्या दिवसापासून भारताला ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले, त्या दिवसापासून ज्या स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण केले जाते त्यातील स्वातंत्र्य सैनिक म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधी. भारतीय नागरिक आणि विशेषत: विद्यार्थ्यांनी गांधींचे स्मरण करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे, असे ते म्हणाले.Gandhi jayanti

यावेळी आमदार असिफ सेठ, महापौर सविता कांबळे, उपमहापौर आनंद चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद, ज्येष्ठ साहित्यिक शिरीष जोशी, शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन मारबानयांग, अपर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, अपर जिल्हा पोलीस अधीक्षक आर.बी.बसरगी,

महानगरपालिका आयुक्त अशोक दुडगुंटी, जिल्हा पंचायत उपसचिव बसवराज हेग्गानायक, स्वातंत्र्यसैनिक राजेंद्र कलघटगी, दलित संघटनेचे नेते मल्लेश चौगले, मनपा अधिकारी विविध शाळेतील मुले सहभागी झाली होती.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.