Monday, July 15, 2024

/

माउंट सिनाई कॉलेजमधील प्रवेशासाठी आवाहन

 belgaum

बेळगाव लाईव्ह :शिक्षणाला तंत्रज्ञानाची जोड (इडी टेक) असलेले बेळगावातील पहिले महाविद्यालय असलेल्या माउंट सिनाई कॉलेजमध्ये वर्ष 2024 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.

या प्रक्रियेदरम्यान प्रवेश अर्ज भरणाऱ्या 2023 24 च्या शैक्षणिक वर्षातील दहावीच्या परीक्षेत 95 टक्के किंवा त्याहून अधिक गुण संपादन केलेल्या पहिल्या दहा विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे, अशी माहिती माउंट सिनाई कॉलेजचे सहसंस्थापक असिफ सईद यांनी दिली.

शहरामध्ये आज मंगळवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. सईद म्हणाले की, कला, वाणिज्य आणि विज्ञान अशा तिन्ही शाखा असलेले माउंट सिनाई कॉलेज हे शिक्षणाला तंत्रज्ञानाची जोड (इडी टेक) देणारे बेळगावातील पहिले कॉलेज असून गतिमान आणि आकर्षक शिक्षण अनुभव देण्यासाठी आम्ही आमच्या अभ्यासक्रमात अत्याधुनिक तंत्रज्ञान समाकलित करतो.

आमच्या कॉलेजमध्ये नीट, जी, के-सीट, नाटा, सीए फाउंडेशन, सीएस फाउंडेशन, आयबीपीएस, एनडीए, आरआरबी आदींसारख्या विविध स्पर्धात्मक परीक्षांसाठी एकात्मिक प्रशिक्षण दिले जाते. आमच्या अभ्यासक्रमात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय), मशीन लर्निंग (एमएल) आणि डाटा सायन्स या उच्च शिक्षणाचा अंतर्भाव असून विद्यार्थ्यांना भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी तयार करणे हा या मागील उद्देश आहे.

आम्हाला देशातील आदरणीय अशा आयआयटी मंडी आणि आयआयटी गुहाटी या संस्थांचा अभिमानास्पद सहयोग लाभत असून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक अनुभव वाढावा यासाठी या प्रतिष्ठित संस्थांचे सर्टिफिकेट कोर्स आमच्याकडे उपलब्ध आहेत. परदेशातील शिक्षणासाठी आमचा समर्पित समुपदेशन विभाग जगभरातील युएसए, इंग्लंड, कॅनडा, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, युक्रेन, रशिया, जॉर्जिया, चीन वगैरे देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये वैद्यक, अभियांत्रिकी, वित्त किंवा विपणन यांसारख्या क्षेत्रात पदवी किंवा पदव्युत्तर पदवी घेण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना मदत करतो.Mount sinai

आता आम्ही 2024 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश अर्ज स्वीकारत असून विद्यार्थी विद्यार्थिनींना शैक्षणिक शुल्कात सूट मिळावी म्हणून आम्ही विभिन्न शिष्यवृत्ती कार्यक्रम ही उपलब्ध केले आहेत. प्रवेश प्रक्रियेदरम्यान प्रवेश अर्ज भरणाऱ्या 2023 24 च्या शैक्षणिक वर्षातील दहावीच्या परीक्षेत 95 टक्के किंवा त्याहून अधिक गुण संपादन केलेल्या पहिल्या दहा विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे, अशी माहिती देऊन अधिक माहितीसाठी इच्छुकांनी कॉलेजचे प्राचार्य सैफ आलम बडेगर अथवा माउंट सिनाई कॉलेज मो. क्र. 8762307000 किंवा

[email protected] येथे संपर्क साधावा, असे आवाहन असिफ सईद यांनी केले. पत्रकार परिषदेस कॉलेजचे सहसंस्थापक फिरोज जमादार, अल्फाज बांदार, प्राचार्य सैफ आलम बडेगर आणि वरिष्ठ व्याख्याता मैलार हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.