belgaum

खोट्या आरोपांविरोधात आयुक्तांकडे कर्मचाऱ्यांची सामूहिक तक्रार

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव महापालिकेच्या महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काही प्रस्थापित व्यक्तींकडून होत असलेल्या कथित छळ आणि खोट्या आरोपांविरोधात महापालिका आयुक्तांकडे सामूहिक तक्रार दाखल केली आहे.

या प्रकारामुळे महसूल विभागातील कर्मचाऱ्यांवर मानसिक तणाव निर्माण होत असून निर्भयपणे काम करणे कठीण झाले असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात, महसूल वसुलीसह निवडणूक कामे, जनगणना, अनधिकृत बॅनर हटविणे, पावसाळी आपत्ती व्यवस्थापन यांसारखी विविध जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडत असल्याचे नमूद केले आहे.

 belgaum

वरिष्ठांनी दिलेली सर्व कामे दिवस-रात्र मेहनत घेऊन पूर्ण केली जात असतानाही काही प्रभावी व्यक्तींकडून “कार्यालयात उपलब्ध नसतात” अशा प्रकारचे निराधार आणि खोटे आरोप करण्यात येत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.

सततच्या आरोपांमुळे महसूल विभागातील कर्मचारी मानसिक तणावाखाली काम करत असून याचा त्यांच्या कामकाजावर परिणाम होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर योग्य कारवाई करावी तसेच महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.