Sunday, September 1, 2024

/

नाव घातल्यास जबाबदारी कुणाची?

 belgaum

बेळगाव लाईव्ह:बेळगाव live ने मागील आठवड्यात एका सहकारी संस्थेत कमिशनच्या आशेने सुरु असलेला गैर कारभार चव्हाट्यावर आणला.

नाव न घालता संस्थेच्या ठेवीदारांच्या हिताच्या चार गोष्टी उजेडात आणल्याबद्दल या लेखमालेचे कौतुक झाले. टीकाही झाली. लेख वाचून अनेकांनी कॉमेंटच्या माध्यमातून संस्थेचे नाव जाहीर करा. अशी मागणी केली आहे.

कमिशनच्या आशेने बेळगाव लाईव्ह हे नाव जाहीर करीत नाही. कमिशन मिळाले आणि लेख थांबले. असा आरोप करतानाच कमिशन मिळाले नसेल तर लेख सुरु करा आणि नाव घाला अशी मागणी काही सन्माननीय वाचकांनी केली आहे. दरम्यान संस्थेचे नाव घातल्यास जबाबदारी कुणाची? असा प्रश्न गंभीर बनला आहे.

बेळगाव शहराच्या सहकार क्षेत्रातील घडामोडीत मराठी संस्थांचे योगदान महत्वाचे आहे. मात्र काही संस्था चालकांनी चुकीचे निर्णय घेऊन आणि फक्त स्वतःच्या हिताचा विचार करून बुडविल्या आहेत. अशा संस्थांचा इतिहास पाहता सरते शेवटी ठेविदारच अडचणीत आला आहे.

सध्या संबंधित मल्टीस्टेट चे संचालकही हाच प्रकार करीत आहेत. कितीही ठेवीदार आले तरी चालतील आम्ही पैसे देऊ शकतो अशा आविर्भावात राहून काम करताना सॉफ्टवेयर च्या मदतीने न वसूल होणारी कर्जे लपवायची आणि आपली भरलेली पोटे आणखी भरत राहायची असा प्रकार सुरु आहे.

माध्यम म्हणून हा सर्व प्रकार समाजासमोर आणताना बेळगाव लाईव्ह ने संस्थेची थेट बदनामी होऊ नये हाच प्रमुख उद्देश डोळ्यासमोर ठेवला आहे. यामुळेच थेट नाव न घेता हा प्रकाशझोत टाकण्यात आला. मात्र नाव घालाच असा आग्रह पाहून आता संबंधित संस्थेची जास्त काळजी न करता नाव जाहीर करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

बेळगाव लाईव्ह च्या संपादक मंडळाने याच्यावर विचार केला. कमिशन घेऊन बुडीत घालण्यात आलेली कर्जे सुरक्षितपणे वसूल करण्यावर संस्थेने भर द्यावा. याआधी ज्यांनी कमिशन घेऊन कर्जे वाटली त्यांना जबादार धरून ती कर्ज वसुली करून घ्यावी, यापुढे सर्व कर्जदारांना एकाच तागडीत तोलून कर्जे देण्यात यावीत आणि ठेवीदारांच्या पैशांवर भू माफियागिरी करून मलई लाटणे थांबवावे ही संबंधित संस्थेने घ्यावयाची काळजी अधोरेखित झाली आहे. असे झाल्यास संस्थेचे नाव कुप्रसिद्धी पासून सुरक्षित ठेवणे योग्य ठरु शकते.

दरम्यान तसे न झाल्यास वाचकांच्या कॉमेंट प्रमाणे संस्थेचे नाव जाहीर करून तेथील सर्वच गैरव्यवहार चव्हाट्यावर आणणे ही माध्यम म्हणून जबाबदारी ठरणार आहे.

यासंदर्भात काय वाटते, बेळगाव लाईव्ह चा हा निर्णय योग्य की अयोग्य? हे वाचकांनी कॉमेंट च्या माध्यमातून कळवावे…. असे आवाहन आम्ही करीत आहोत. (क्र. म. श. )

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.