Sunday, July 21, 2024

/

भाजप जे डी एस आमदार काँग्रेस मध्ये येतील

 belgaum

बेळगाव लाईव्ह : कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी बुधवारी भाजप आणि जे डी एस आमदारां बाबत मोठे विधान केले आहे.आगामी 15 नोव्हेंबर दिवाळीनंतर जेडीएस-भाजपचे अनेक आमदार काँग्रेस पक्षात सामील होतील.

दिल्ली दौऱ्यावर असलेले डीसीएम डीके शिवकुमार यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले की, दिवाळीनंतर राज्याच्या राजकारणात अनेक बदल होतील. भाजप आणि जेडीएस नेते आमच्या संपर्कात आहेत. १५ नोव्हेंबरला आमच्या पक्षात आणखी नेते सामील होतील, असे सांगून त्यांनी ऑपरेशन हस्ताचे संकेत दिले.

कुणीही आमच्या एका आमदारालाही फोन करू शकत नाही :

राज्यातील सध्याच्या परिस्थितीत भाजप आमच्या एका आमदारालाही फोन करू शकत नाही. भाजपमध्ये नेतृत्व निश्चित झालेले नाही उगीचच भाजप संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे असं देखील शिवकुमार यांनी म्हंटले आहे.

भाजपलाच अनेक समस्या आहेत आणि आमच्या आमदारांना आकर्षित करणं तर दूरची गोष्ट आहे

भाजपला अस्तित्वात नसलेल्या परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. सध्या ते बाजारात चालू असावेत. तिथे जाऊन त्यांना भेटून त्यांच्याशी बोलून बातम्या देत असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, नेत्यांनी काही कामाच्या मुद्द्यावर एकमेकांना भेटले तरी बातमी होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.