बेळगाव लाईव्ह:बेळगावच्या स्वीमर्स क्लब आणि एक्वेरियस क्लबच्या जलतरणपटूंनी बेंगलोर येथे नुकत्याच पार पडलेल्या शालेय मुलांच्या कर्नाटक राज्य पातळीवरील क्रीडा महोत्सवामध्ये घवघवीत यश संपादन करताना एकूण 29 पदकांची कमाई केली आहे. यामध्ये सुवर्णपदके हस्तगत करणाऱ्या 7 जलतरणपटूंची आता राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
राज्याच्या शालेय शिक्षण खात्यातर्फे बेंगलोर येथे गेल्या 17 व 18 ऑक्टोबर रोजी शालेय मुलांसाठीच्या कर्नाटक राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
या महोत्सवातील बसवनगुडी अक्वेटिक सेंटर झालेल्या जलतरण स्पर्धेमध्ये बेळगावच्या स्वीमर्स क्लब आणि एक्वेरियस क्लबच्या जलतरणपटूंनी मिळविलेले सुयश पुढील प्रमाणे आहे.
अमन सूनगार -3 सुवर्ण पदकं, 1 कांस्य पदक. सार्थक श्रेयकर -2 सुवर्ण पदकं, 2 रौप्य पदकं, 1 कांस्य पदक. यशराज पावशे -1 सुवर्ण पदक, 1 रौप्य पदक, 2 कांस्य पदकं, लावण्य आदीमनी -1 सुवर्ण पदक, 2 रौप्य पदकं. समीक्षा घसारी -4 रौप्य पदकं.
अभिनव देसाई -1 रौप्य पदक, 1 कांस्य पदक. चैत्राली मेलगे -1 रौप्य पदक, 1 कांस्य पदक. आर्यवंश गायकवाड -1 रौप्य पदक. खुशी हेरेकर -3 कांस्य पदकं. अर्णव निर्मळकर -1 कांस्यपदक. यापैकी अमन सुनगार, सार्थक श्रेयकर, यशराज पावशे,
लावण्या आदीमनी, समीक्षा घसारी, अभिनव देसाई आणि चैत्राली मेलगे या सुवर्णपदक विजेत्या जलतरणपटूंची आता पुढील महिन्यात नवी दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील शालेय क्रीडा महोत्सवासाठी निवड झाली आहे.
वरील सर्व जलतरणपटू शहरातील केएलई सुवर्ण जेएनएमसी जलतरण तलावामध्ये पोहण्याचा सराव करतात. त्यांना जलतरण प्रशिक्षक उमेश कलघटगी, अक्षय शेरेगार, अजिंक्य मेंडके, नीतिश कुडूचकर, गोवर्धन काकतकर आणि इम्रान उचगावकर यांचे मार्गदर्शन,
त्याचप्रमाणे आई-वडिलांसह केएलई सोसायटीचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे, जय भारत फाउंडेशनचे अध्यक्ष जयंत हुंबरवाडी, रो. अविनाश पोतदार, माणिक कपाडिया, लता कित्तूर, सुधीर कुसाणे, प्रसाद तेंडुलकर आदींचे प्रोत्साहन लाभत आहे.