belgaum

गोकाकमध्ये पोलिसांच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

0
Gokak news
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यामधील बेंडिगेरी गावामध्ये एका तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात त्याने पोलीस अधिकारी आणि काही स्थानिक सावकारांच्या जाचाला कंटाळून हे पाऊल उचलल्याचे स्पष्ट केले आहे.

रवींद्र दानव्वागोळ असे मृत तरुणाचे नाव असून, राहत्या घरीच त्याने आपली जीवनयात्रा संपवली. काही लोकांकडून सतत मिळणाऱ्या जीवे मारण्याच्या धमक्यांमुळे आपण अत्यंत मानसिक दबावाखाली होतो, असे त्याने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केले आहे.

लक्ष्मण चंदरगी आणि भरमप्पा पूजारी यांच्याकडून आठ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते, असे रवींद्र यांनी पत्रात लिहिले आहे. ही रक्कम परत मागताना संबंधित सावकारांनी आपल्याला गंभीर धमक्या दिल्या. या त्रासाबाबात स्थानिक पोलिसांकडे तक्रार करूनही आपल्याला न्याय नाकारण्यात आला, असा थेट आरोप त्यांनी केला आहे.

 belgaum
Gokak news

या संपूर्ण प्रकरणात पीएसआय आनंद आणि तत्कालीन डीवायएसपी मुल्ला यांनीही आपल्यावर अन्याय केला आणि आरोपींना पाठीशी घातले, असे रवींद्र यांनी पत्रात म्हटले आहे. त्यांच्या आत्महत्येची बातमी समजताच कुटुंबीयांनी न्यायासाठी पोलीस ठाण्याबाहेर मोठा आक्रोश केला.

घटनेची माहिती मिळताच मूडलगी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृत रवींद्र यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून आणि ‘डेथ नोट’मधील मजकुराच्या आधारे मूडलगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास केला जात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.