belgaum

बळ्ळारी नाला येथे जुगार अड्ड्यावर छापा; 8 जणांना अटक

0
Cop bgm
 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरानजीक बळ्ळारी नाल्याशेजारी सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर छापा टाकून शहापूर पोलिसांनी काल 8 जणांना अटक करण्याबरोबरच त्यांच्या जवळील रोख 47,200 रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले.

धनराज उर्फ बंडू महादेव सुतार (वय 32, रा. महाद्वार रोड), नजीर अजीज पठाण (वय 50, रा. शिवाजीनगर), श्रीधर ज्योतिबा लोहार रा. (उप्पार गल्ली खासबाग), राहुल मनोहर हलगेकर (वय 44, रा. पाटील गल्ली) नागप्पा सिद्राई नाईक (वय 67, रा. लक्ष्मीनगर काकती), विनायक गिरीधर दरमूडे (वय 39, रा. कुंतीनगर खासबाग), विश्वनाथ रवी गोटडकी (वय 29, रा भांदूर गल्ली) आणि शशी सुब्रमणे जालगार (वय 35, रा. कपिलेश्वर कॉलनी बेळगाव) अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

हे सर्वजण स्व-स्वार्थासाठी शहरानजीक बळ्ळारी नाल्याशेजारी सार्वजनिक ठिकाणी पैसे लावून पत्त्यांचा जुगार खेळत होते. याबाबतची माहिती मिळताच शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मनीकंट पुजारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी धाड टाकून आरोपींना रंगहात पकडले.

 belgaum

तसेच त्यांच्या जवळील रोख 47,200 रुपये आणि पत्ते वगैरे जुगाराचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.