माणसाला सामाजिक जबाबदारीचे भान असणे गरजेचे आहे.केवळ आपण आनंदी होणे किंवा चंगळवादी संस्कृतीला जवळ करणे म्हणजे माणसाचे जगणे नव्हे!तर आपल्या बरोबर इतरांनाही आनंदी करणे याचाच अर्थ माणसाचे सुसंस्कृत जगणं असे आहे.
काही लोकं आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या संकल्पना लढवतात,जंगलात जातात काही जण पाण्यात मौज मजा करण्यासाठी धबधबे धरणे निवडतात काही जण सहली आयोजित करतात पार्ट्या करतात तर काही फटाके उडवतात वाढदिवसाचा केक एकेमकाच्या चेहऱ्यावर लाऊन सेलिब्रेशन करतात,नृत्य करतात पण या पाश्र्वभूमीवर बेळगाव रेल्वे स्थानकाच्या मुख्य तिकीट तपासनीस रुक्साना बी यांनी आपल्या चिरंजीव जुनेद याचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत वृद्धाश्रमात साजरा केला आहे.
रूकसाना आणि कुटुंबीयांनी जूनेदच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शांताई वृद्ध आश्रमातील आजी आजोबा सोबत वाढ दिवस साजरा करत त्यांच्या सोबत वेळ घालविला आणि त्यांना मदतही केली.
माजी महापौर विजय मोरे यांनी अनेक वेळा अनेक जणांना वेगवेगळ्या पद्धतीनं शांताई वृद्ध आश्रमात गुंतवून आपल्या आयुष्यातील आनंदी क्षण इथल्या वृद्धांच्या सोबत घालवण्याच्या संकल्पना मांडल्या.त्याच बरोबर अनेकांना तश्या संधी देखील उपलब्ध करून दिल्या त्यामुळे अनेकांना अश्या पद्धतीच्या उपक्रमाचे आकर्षण वाटू लागले आहे हे देखील विजय मोरे यांचे एक प्रकारचे यश आहे.
कुणीही जन्म दिनाच्या निमित्ताने असे उपक्रम करत आदर्श घ्यावा आणि माणुसकीची विन घट्ट व्हावी यासाठीच अश्या पद्धतीने अनेक उपक्रम होणे गरजेचे आहे.