belgaum

मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या जावयाच्या घरावर ईडीचा छापा

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : कर्नाटकचे सार्वजनिक बांधकाम आणि बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे जावई आणि बेळगावचे अबकारी उपनियमन आयुक्त व्ही. मंजुनाथ यांच्या घरावर ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला आहे.

ईडीच्या अधिकाऱ्यांनी बेळगाव, म्हैसूर, बेंगलोर व अरसिकेरी यांच्यासह एकूण सहा ठिकाणी एकाच वेळी छापे मारले असून व्ही. मंजुनाथशी संबंधित अनेक ठिकाणी सखोल नोंद तपासणी आणि दस्तऐवज, डिजिटल साधने जप्त करण्याची कारवाई करण्यात आली.

म्हैसूरमधील त्यांच्या स्नेहिताच्या घरावर, बेंगलोरमधील अपार्टमेंटवर, हासन जिल्ह्यातील अरसिकेरी येथील नातलगाच्या घरावर आणि अथणी तालुक्यातील ऐनापूर गावातील स्नेहिताच्या घरावरही ईडीच्या अधिकार्‍यांनी छापा टाकला आहे.

 belgaum


बेळ्ळारीचे माजी खासदार देवेंद्रप्प यांचे चिरंजीव असलेल्या व्ही. मंजुनाथ यांच्यावर बेनामी नावाखाली जमीन-जुमला, बार व रेस्टॉरंट्स यांच्या माध्यमातून बेकायदेशीर संपत्ती कमावल्याचा आरोप आहे.

सध्या बेंगलोरमधील अपार्टमेंटमध्ये असलेल्या व्ही. मंजुनाथ यांच्या निवासस्थानीही नोंदींची तपासणी सुरू आहे. असून डिजिटल आधारित पुरावे, मोबाइल व संगणक तपासले जात आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.