belgaum

बेळगाव लाईव्ह : महिलांनी अनेक क्षेत्रात जरी प्रगती केली तरी अद्याप बहुतांशी मध्यमवर्गीय कुटुंबातील महिला व्यवसाय हे आपले क्षेत्रच नसल्याचे ठाम मत बनवून आहेत. घरकाम करणाऱ्या, घर सांभाळणाऱ्या, नोकरी करणाऱ्या यासारख्या अनेक क्षेत्रात आपली जबाबदारी पार पाडणाऱ्या महिलांसाठी शेअर मार्केट मध्ये करियर करण्याची संधी आज उपलब्ध झाली आहे. परंपरागत समजुतीतून बाहेर पडून मराठी समाजाने आपल्या कुटुंबातील महिलांना आर्थिक साक्षर बनवणे हि आजची खरी गरज आहे.

आर्थिक नियोजन करण्यात कुटुंब व्यवस्थेत पुरुषांपेक्षा महिलाच अधिक सरस ठरल्या आहेत हे आजवर सिद्ध झाले आहे. आर्थिक चौकटीत उत्पन्न आणि खर्च यातील प्राधान्यक्रम ठरवताना महिला गुंतवणुकीला अधिक प्राधान्य देतात.

साक्षर कुटुंब असो किंवा निरक्षर, सधन असो किंवा करिअर ओरिएंटेड प्रत्येक टप्प्यावर गुंतवणूक या घटकावर महिलांची दृष्टी ही अधिक सजग असलेली पाहायला मिळते. मात्र आजची परिस्थिती पाहता वाढती महागाई, दैनंदिन वस्तूंचे वाढलेले दर, महागाईच्या दिवसात सर्व खर्चाची ताळमेळ या आणि अशा अनेक समस्यांतून मार्ग काढण्यासाठी आणि स्वतःच्या पायावर उभं राहून ‘आर्थिक साक्षर’ होण्याची आवश्यकता आज प्रत्येकाला आहे. आज प्रत्येक स्तरावरील व्यक्ती शेअर मार्केट संदर्भात माहिती घेत आहे.

मात्र शेअर मार्केट संदर्भात इत्यंभूत माहिती उपलब्ध नसल्याने किंवा अर्धवट माहिती घेतल्यामुळे अनेकांनी शेअर मार्केटच्या माध्यमातून नकारात्मक निकाल पाहिले आहेत. शेअर मार्केट संदर्भातील इत्यंभूत माहिती, प्रॅक्टिकल ज्ञान, आणि संपूर्ण सरावासह ट्रेडिंग करून आत्मविश्वासाने शेअर मार्केटमध्ये काम करण्याची संधी बेळगावमधील सर्वात जुन्या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येत आहे.Share market

गेल्या १२ वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या ‘भारतीय शेअर मार्केट इन्स्टिट्यूट’ च्या माध्यमातून आजवर अनेकांनी शेअर मार्केट क्षेत्रात यश कमाविले आहे. बेळगावमधील मराठी समाजासह सर्व समाजातील सर्वसामान्य कुटुंबातील महिलादेखील या क्षेत्रात उतराव्यात, आर्थिक सक्षम व्हाव्या, आर्थिक साक्षरतेच्या दिशेने प्रगती कराव्या या उद्देशाने अत्यंत माफक दरात शेअर मार्केट संदर्भातील संपूर्ण ज्ञान आपल्या सहज आणि सोप्या मराठी भाषेत देण्यात येत आहे. आजवर या संस्थेने अनेक महिलांना या क्षेत्राचे ज्ञान देऊन आर्थिक सक्षम होण्यासाठी सहकार्य केले आहे.

याचप्रमाणे महिलांसाठी विशेष बॅच आणि विशेष सवलतीच्या दरात पुन्हा एकदा शेअर मार्केट संदर्भातील प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला असून ज्या महिलांना शेअर मार्केट संदर्भातील संपूर्ण माहिती आणि प्रशिक्षण घ्यावयाचे आहे, त्यांनी भारतीय शेअर मार्केट, तिसरा मजला, सिटी प्लाझा, कृष्णदेवराय सर्कल, बेळगाव येथे संपर्क साधावा, किंवा अधिक माहितीसाठी ९६६३०७१७५७ या क्रमांकाशी संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.