Friday, April 19, 2024

/

प्रताप कालकुंद्रीकर मि. कर्नाटक श्री चॅम्पियन ऑफ चॅम्पियन!

 belgaum

कर्नाटक असोसिएशन ऑफ बॉडी बिल्डर्स आणि शहाबाद तालुका शरीर सौष्ठव संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मिस्टर कर्नाटक श्री -2023 या राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेतील ‘मि. कर्नाटक श्री चॅम्पियन ऑफ चॅम्पियन’ हा मानाचा किताब बेळगावच्या प्रताप कालकुंद्रीकर यांनी हस्तगत केला. त्याचप्रमाणे बेळगावच्या प्रवीण कणबरकर याने स्पर्धेचे उपविजेतेपद तर उमेश गंगणे यांनी ‘उत्कृष्ट पोझर’ हा किताब पटकाविला.

शहाबाद (जि. कलबुर्गी) येथील सहारा सभागृहामध्ये गेल्या रविवारी उपरोक्त शरीर सौष्ठव स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली. आयबीबीएफ मुंबईच्या मान्यतेने विविध 6 वजनी गटात घेण्यात आलेल्या या स्पर्धेचा अंतिम निकाल पुढील प्रमाणे आहे.

55 किलो गट : 1) सईद गौस (कलबुर्गी), 2) मंजुनाथ कंपली (धारवाड), 3) इरफान (कलबुर्गी), 4) सनतकुमार डी. एस. (धारवाड). 60 किलो गट : 1) उमेश गंगणे (बेळगाव), 2) नितीश गोरल (बेळगाव), 3) मुखराम (कलबुर्गी), 4) मंजू (विजयनगरा), 5) अर्नाल्ड (मंगळूर). 65 किलो गट : 1) सोमशेखर कर्वी (उडपी), 2) रोनाल्ड डिसोजा (मंगळूर), 3) रोहन अल्लुर (बेळगाव). 70 किलो गट : 1) प्रताप कालकुंद्रीकर (बेळगाव), 2) चांद शेख (कलबुर्गी), 3) गिरीश शहापूरकर (कलबुर्गी),Body building

 belgaum

4) शिवकुमार जळकी (कलबुर्गी), 5) एम. डी. माज (कलबुर्गी). 75 किलो गट : 1) प्रवीण कणबरकर (बेळगाव), 2) महेश कुमार (कलबुर्गी) 3) रमेश अंबिगेर (धारवाड). 75 किलो वरील गट : 1) विकास सूर्यवंशी (बेळगाव), 2) गजानन काकतीकर (बेळगाव). चॅम्पियन ऑफ चॅम्पियन -प्रताप कालकुंदरीकर (बेळगाव). फर्स्ट रनर्स अप -प्रवीण कणबरकर (बेळगाव), बेस्ट ओझर -उमेश गंगणे (बेळगाव).

स्पर्धेनंतर आयोजित बक्षीस वितरण समारंभात पाहुण्यांच्या हस्ते चॅम्पियन ऑफ चॅम्पियन प्रताप कालकुंदरीकर याला मानाचा किताब, 20000 रुपये रोख, आकर्षक चषक, प्रमाणपत्र व भेटवस्तू तर उपविजेत्या प्रवीण कणबरकर याला 10000 रुपये रोख व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले उत्कृष्ट पोझर उमेश गंगणे याला 5000 रुपये रोख व चषक देऊन सन्मानित करण्यात आले. सदर स्पर्धेत राज्यभरातील शरीर सौष्ठवपटूंनी भाग घेतला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.