belgaum

बेकायदा दारू विक्री करणाऱ्या दोघांना अटक; 20 हजाराची दारू जप्त

0
241
Apmc police station
Apmc police station
 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील सह्याद्रीनगर, बॉक्साईट रोड येथे सार्वजनिक ठिकाणी दारूची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या दोघा युवकांना एपीएमसी पोलिसांनी काल अटक करून त्यांच्या जवळील एकूण 20,326 रुपये किमतीचा दारू साठा जप्त केला.

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे गौतम कल्लप्पा कलखांबकर (वय 24) आणि सतीश यल्लाप्पा चौगुला (वय 29, दोघेही रा. ब्रह्मलिंग गल्ली, सुळगा) अशी आहेत. हे दोघे काल शनिवारी शहरातील सह्याद्रीनगर, बॉक्साईट रोड येथे सार्वजनिक ठिकाणी कोणताही परवाना नसताना स्वतःच्या स्वार्थासाठी दारूची बेकायदेशीर विक्री करत होते.

याची माहिती मिळताच एपीएमसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जे. एल. कोटबागी यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने धाड टाकून दोघाही आरोपींना रंगेहात पकडले.

 belgaum

तसेच त्यांच्या जवळील किंगफिशर स्ट्रॉंग बियरचे 1955 रुपये किमतीचे 23 टेट्रा पॅक, टूबर्ग प्रीमियम बियरचे 1920 रुपये किमतीचे 24 टेट्रा पॅक आणि डीएसपी ब्लॅक व्हिस्कीच्या 6451 रुपये

किमतीच्या बाटल्या, असा एकूण 20 हजार 326 रुपये किमतीचा दारू साठा जप्त केला. याप्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.