Wednesday, May 8, 2024

/

सोमवारी मंगळवारी शास्त्री नगर महाद्वार रोड परिसरात पद यात्रा

 belgaum

म.ए.समितीचे बेळगाव दक्षिण मतदार संघाचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोडुसकर यांच्या प्रचारार्थ सोमवार दि. 24 रोजी सकाळी 7 वाजता पदयात्रेचा प्रारंभ कपिलेश्वर देवस्थान येथून होणार आहे.

त्यानंतर महाद्वार रोड पहिला क्रास, संभाजी गल्ली, महाद्वार रोड दुसरा, तिसरा व चौथा क्रास, आपटेकर गल्ली व संपूर्ण कपिलेश्वर कालनी फिरेल.
पदयात्रेत या भागातील पंच मंडळी, युवक मंडळे व महिला मंडळानी मोठ्या संख्येने सामिल व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

रमाकांत कोंडुसकर यांच्या प्रचार कार्यालयाचे
सोमवारी उद्घघाटन

 belgaum

महाराष्ट्र एकीकरण समितीचे बेळगाव दक्षिण मतदार संघाचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोडुसकर यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घघाटन सोमवार दि. 24 रोजी सायंकाळी पाच वाजता बॅ. नाथ पै सर्कल ते खासबाग मार्गावरील डबल रोड येथील कै.संभाजीराव पाटील यांच्या इमारतीत होणार आहे. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी व सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. तसेच अन्य पदाधिकारी व आजी माजी लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
यावेळी बेळगाव दक्षिण मतदार संघातील म.ए.समितीचे कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या व युवा कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Ramakant
बेळगाव: म.ए.समितीचे बेळगाव दक्षिण मतदार संघाचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोडुसकर यांच्या प्रचारार्थ मंगळवार दि. 25 रोजी सकाळी 7 वाजता पदयात्रेचा प्रारंभ न्यू गुडशेड रोड येथील रेणुका हॉटेल येथून होणार आहे .त्यानंतर न्यू गुडशेड रोड, शास्त्री नगर येथील सर्व क्रास फिरून पाटीदार भवन भागातील सर्व क्रास,संतसेना रोड व हुलबत्ते कालनी

सायंकाळी पाच वाजता महात्मा फुले रोड येथील बॅंक ऑफ इंडिया येथून प्रारंभ महात्मा फुले रोड येथून बुरजाई गल्ली येथून कोरे गल्लीतील मधल्या मार्गाने मिरापूर गल्ली, कचेरी गल्ली, हट्टीहोल गल्ली, कोरे गल्ली, भोज गल्ली, मेलगे गल्ली, जेड गल्ली, अलवण गल्ली, पी के क्वाटर्स येथून बॅ.नाथ पै चौकात सांगता.
पदयात्रेत या भागातील पंच मंडळी, युवक मंडळे व महिला मंडळानी मोठ्या संख्येने सामिल व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.