belgaum

नातेवाईक नसलेल्या बेवारस मृतदेहावर माणुसकीने अंत्यसंस्कार

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह: गेल्या दहा ते बारा दिवसांपासून शवागृहात ठेवण्यात आलेल्या बेवारस मृतदेहावर अखेर सदाशिवनगर स्मशानभूमीत सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले. मृतदेहाची ओळख पटविण्यासह नातेवाईकांचा शोध घेण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. मात्र, कोणीही नातेवाईक पुढे न आल्याने मार्केट पोलिसांनी माजी महापौर विजय मोरे यांच्याशी संपर्क साधला.

माहिती मिळताच विजय मोरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करत अंत्यसंस्काराची व्यवस्था केली. यासाठी मार्केट पोलिस ठाण्याच्या राजेश्री भोसले, डी. बी. पाटील आणि निशार स्मॅशर यांच्यासह शवविच्छेदन कक्षातील दीपक यांनी सहकार्य केले.

सदाशिवनगर स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनी मृतदेहावर विधिवत अंत्यसंस्कार करून सन्मानाने अखेरचा निरोप दिला. यावेळी सदाशिवनगर परिसरातील काही स्थानिक नागरिकांनीही उपस्थित राहून अंत्यसंस्काराच्या प्रक्रियेत सहभाग घेतला.

 belgaum

नातेवाईक किंवा कुटुंबीय उपस्थित नसतानाही मृत व्यक्तीला सन्मानपूर्वक अखेरचा निरोप मिळावा, या भावनेतून करण्यात आलेल्या या उपक्रमातून माणुसकीचा प्रत्यय आला. मृत व्यक्ती बेवारस असली तरी प्रत्येकाला सन्मानाने अंतिम निरोप मिळणे हा मानवी हक्क असल्याचा संदेश या घटनेतून अधोरेखित झाला.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.