belgaum

मराठा युवक संघातर्फे बेळगाव डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर्स फेडरेशनच्या सहकार्याने आयोजित कै. एल. आर. पाटील स्मृती जिल्हास्तरीय 57 व्या बेळगाव श्री शरीर सौष्ठव स्पर्धेच्या विजेतेपदासह मानाचा ‘बेळगाव श्री’ किताब कॉर्पोरेशन जिमच्या विकास सूर्यवंशी याने हस्तगत केला. त्याचप्रमाणे प्रवीण कणबरकर यांनी ‘बेळगाव हर्क्युलस’ किताब पटकावला.

bg

रेल्वे ओव्हर ब्रिज नजीकच्या मराठा मंदिर सभागृहामध्ये काल रविवारी रात्री सदर स्पर्धा उत्स्फूर्त प्रतिसादात यशस्वीरित्या पार पडली. बेळगाव श्री स्पर्धेतील ‘बेस्ट पोझर’ किताबाचा मानकरी एसएसएस फाउंडेशनचा उमेश गंगणे हा ठरला. शहरासह जिल्ह्यातील सुमारे 125 हून अधिक शरीर सौष्ठवपटूंचा सहभाग असलेल्या सदर स्पर्धा एकूण विविध आठ वजनी गटात घेण्यात आली.

स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ डॉ. अरुण किल्लेकर, एसएसएस फाउंडेशनचे अध्यक्ष माजी नगरसेवक संजय सुंठकर, दिगंबर पवार, बाळासाहेब काकतकर आदी मान्यवरांच्या हस्ते पार पडला. स्पर्धेसाठी पंच म्हणून अजित सिद्धनावर, एम. के. गुरव, एम. गंगाधर, हेमंत हावळ, बसवराज अरळीमट्टी, प्रशांत सुगंधी, सुनील पवार, अनंत लंगरकांडे आणि नूर मुल्ला यांनी काम पाहिले. स्टेज मार्शलची भूमिका सुनील राऊत, गजानन हंगिर्गेकर आणि सुनील अष्टेकर यांनी निभावली. स्पर्धेचा गटवार अंतिम निकाल (अनुक्रमे पहिले पाच विजेते) पुढीलप्रमाणे आहे.

55 किलो गट -आकाश निगराणी (पॉलिहाइड्रॉन जीम), ज्योतिबा बिर्जे (भवानी जिम), नारायण जोशीलकर (मंथन जिम), सुनील भोजनाळ (फिटनेस जीम), केतन भातकांडे (युनिव्हर्सल जिम). 60 किलो गट -उमेश गंगणे (एसएसएस फाउंडेशन), बबन पोटे (रॉ फिट), रोहन अल्लुर (कॉर्पोरेशन जिम), कपिल कामानाचे (राॅ फिट), ओमकार पाटील (युनिव्हर्सल जिम). 65 किलो गट -विनायक अनगोळकर (बॉडी बेसिक), नागेश संताजी (श्री समर्थ), मंजुनाथ सोनटक्के (बॉडी वर्क), रोहन पालनकर (फिटनेस फोर्ज),Body building

विजय निलजी (भैरू फिट). 70 किलो गट -विजय पाटील (बीई स्ट्रॉंग), सुनील भातकांडे (एक्स्ट्रीम जिम), संदीप दावळे (मॉर्डन जिम), विनीत हणमशेठ (रॉ फिट), गणेश पाटील (मोरया जिम). 75 किलो गट -प्रताप कालकुंद्रीकर (पॉलिहाइड्रॉन जिम), अफ्रोज ताशिलदार (गोल्ड जिम), राहुल हिरोजी (युनिव्हर्सल जिम), विनायक चव्हाण (बॉडी बेसिक), अंकुर टपाले (बॉडी वर्क). 80 किलो गट -महेश गवळी (रुद्रा जिम), गजानन काकतीकर (एसएसएस फाउंडेशन), दयानंद निलजकर (बॉडी बेसिक), प्रशांत पाटील (फिटनेस क्लब खानापूर). 80 किलो वरील गट -विकास सूर्यवंशी (कॉर्पोरेशन जिम), व्ही. बी. किरण (राजू मोरे फाउंडेशन), एम. डी. शकीब (7 स्टार सीकेडी), राघवेंद्र नाईक (मोरया जिम), आदित्य पाटील (बीई स्ट्राँग). बेळगाव हर्क्युलस : प्रवीण कणबरकर, बेस्ट पोझर : उमेश गंगणे एसएसएस फाउंडेशन, बेळगाव श्री : विकास सूर्यवंशी कॉर्पोरेशन जिम.

सदर स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी मराठा युवक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब काकतकर यांच्या नेतृत्वाखाली मारुती देवगेकर, नेताजी जाधव, रघुनाथ बांडगी, चंद्रकांत गुंडकल, दिनकर घोरपडे, अजित सिद्धनावर, विश्वास पवार, शेखर हंडे आदींसह संघाचे अन्य सदस्य तसेच बेळगाव डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर्स असोसिएशनने विशेष परिश्रम घेतले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.