बेबेळगाव महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने अनगोळ परिसरातील अवैध रचना -बांधकामाविरुद्ध चालवलेल्या मोहिमे अंतर्गत या२, रोड येथील अतिक्रमणे काल रात्री उशिरापर्यंत काढण्यात येत होती.
मिळालेल्या माहितीनुसार महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव सोमवारी अनगोळ नाका ते मराठी शाळा या मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम काल सोमवारी हाती घेतली होती. या मोहिमेअंतर्गतच अतिक्रमण हटाव पथकाने काँग्रेस रोड आणि जवळच्या गल्ल्यांमधील स्टॉल आणि काही अवैध बांधकामांवर काल रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू ठेवली होती.
मोहीमेत जेसीबीच्या सहाय्याने काढलेली साधने आणि साहित्य तात्पुरत्या साठवणीसाठी घेण्यात आले. प्रतिकूल परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्तात शांततेने आणि नियमानुसार ही अतिक्रमण हटाव कारवाई करण्यात आली. अतिक्रमण हटवणे ही नागरिकांच्या सुव्यवस्थित जीवनशैलीसाठी आणि पायवाट-सारख्या सार्वजनिक सोयींच्या सुरक्षेसाठी गरजेची पावले असल्याचे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान काँग्रेस रोडवरील अतिक्रमणे काळजीपूर्वक काढण्यात आल्याने परिसरात चांगला फरक दिसत आहे. मात्र वडगाव मेन रोडवरही फरशी-प्लंबिंग आणि कंत्रक्शनसाठी वापरल्या गेलेल्या पत्र्याच्या शेडमुळे पादचारी मार्ग आणि रस्त्यावर अडथळे निर्माण झाले आहेत त्याकडेही लक्ष देण्याची मागणी होत आहे.
सदर अतिक्रमण हटाव मोहिमे अंतर्गत काही ठिकाणी पत्र्याचे शेड आणि कंट्रक्शनसंबंधी साहित्य रस्त्यावर आणि पुटपाथवर ढकलून ठेवण्यात आले आहे; त्यामुळे पादचारी व वाहनचालनाला त्रास होत आहे. नागरिकांनी महानगरपालिकेकडे तातडीने हे अतिक्रमण हटवण्याची मागणी केली असून भविष्यात अशा अडथळ्यांविरुद्ध कायमस्वरूपी व्यवस्था करण्याचा आग्रह धरला आहे.




