नुकत्याच बंगलोर तसेच मेंगलोर येथे खेलो इंडिया च्या अंतर्गत दस का दम महिला राज्य पातळीवरील झालेल्या जलतरण स्पर्धेत बेळगाव आबा व हिंद स्पोर्ट्स क्लबची जलतरणपटू कुमारी दिशा होंडी व कुमारी आरोही चित्रगार यानी अनुक्रमे बेंगलोर व मंगलोर येथे नुकत्याच झालेल्या राज्य पातळीवरील वयोगटांमध्ये भाग घेऊन उत्कृष्ट कामगिरी केली.
दिशा होंडी हिने पन्नास मीटर फ्रीस्टाइल 100 मीटर फ्रीस्टाइल पन्नास मीटर बटरफ्लाय पन्नास मीटर ब्रेस्ट्रस्ट्रोक या प्रकारात चार सुवर्णपदके तसेच पन्नास मीटर बॅकस्ट्रोक मध्ये एक रौप्य पदक असे एकूण पाच पदके मिळवून या स्पर्धेत आपला ठसा उमटवला व वैयक्तिक चॅम्पियनशिप मिळवली.
कुमारी आरोही चित्रगार हिने मंगळूर येथे झालेल्या दस का दम महिलांच्या जलतरण स्पर्धेत भाग घेऊन 50 मीटर ब्रेस्टस्ट्रोक व 50 मिटर बटरफ्लाय या प्रकारात दोन रौप्य तर 50 मिटर फ्री स्टाईल व 50 मीटर बॅकस्ट्रोक व 100 मीटर फ्रीस्टाइल प्रकारात कास्य असे एकूण पाच पदके संपादन केली.
वरील दोघेही जलतरणपटूना एन आय एस जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार,अमित जाधव, संदीप मोहिते,रणजीत पाटील यांचे बहुमोल मार्गदर्शन तसेच क्लबचे अध्यक्ष अरविंद संगोळी, शीतल हुलबत्ते, एडवोकेट मोहन सप्रे यांचे प्रोत्साहन लाभते.