belgaum

SIR : बेळगावात BLO प्रशिक्षण १००% पूर्ण

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : विशेष सघन मतदार यादी पुनरिक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत बेळगाव जिल्ह्यातील सर्व १८ विधानसभा मतदारसंघांमध्ये बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) यांचे १०० टक्के प्रशिक्षण पूर्ण झाले असून, मतदारांना गणना फॉर्म (Enumeration Forms) वाटपाची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. २ जुलै २०२६ रोजी दुपारी २.०५ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार जिल्ह्यातील सर्व ४,५२५ BLO यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

जिल्ह्यात एकूण ४१.०७ लाख मतदार असून, त्यापैकी ४.३८ लाख (१०.६८ टक्के) मतदारांना गणना फॉर्मचे वितरण पूर्ण झाले आहे. तसेच ९९.५५ टक्के फॉर्मचे डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे.

मतदारसंघनिहाय पाहता, रायबाग मतदारसंघात सर्वाधिक ४५,९२२ (२०.७६ टक्के) फॉर्मचे वितरण झाले आहे. त्यापाठोपाठ निपाणी (१५.८६ टक्के), कुडची (१५.१८ टक्के), कित्तूर (१४.१९ टक्के), बेळगाव ग्रामीण (१३.६४ टक्के) आणि बैलहोंगळ (१२.८६ टक्के) या मतदारसंघांचा क्रमांक लागतो.

 belgaum

दुसरीकडे, हुक्केरी (५.३५ टक्के), सौंदत्ती-यल्लम्मा (६.९२ टक्के), यमकनमर्डी (७.१५ टक्के), गोकाक (७.५८ टक्के) आणि अथणी (७.८५ टक्के) या मतदारसंघांमध्ये फॉर्म वितरणाचे प्रमाण तुलनेने कमी आहे.

प्रशासनाकडून उर्वरित मतदारांपर्यंत फॉर्म पोहोचवून SIR प्रक्रिया निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी BLO यांच्यामार्फत घरोघरी भेटी सुरू असल्याची माहिती अहवालात नमूद करण्यात आली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.