belgaum

बेळगाव लाईव्ह : शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत शेट्टी गल्ली येथील घराचे लाखोंचे नुकसान झाले आहे. परशुराम किल्लेकर यांच्या घराला सकाळी ११.३० च्या दरम्यान लागलेल्या आगीत संसारोपयोगी साहित्यासह महत्वाची कागदपत्रे आणि घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

bg

सदर कुटुंबात दोन कुटुंबांचे सदस्य राहत होते. सकाळी ११.३० च्या सुमारास लागलेल्या आगीत सुमारे ४० लाखांहून अधिक मालमत्ता नष्ट झाली आहे. सदर माहीत समजताच घटनास्थळी उत्तर मतदार संघाचे आमदार अनिल बेनके, तहसीलदार यांनी भेट देऊन पाहणी केली आहे.

संसारोपयोगी साहित्यासह किल्लेकर यांच्या मुलीची शैक्षणिक कागदपत्रे देखील आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. हि मुलगी नुकत्याच एका कंपनीत नोकरीसाठी अर्ज करून आली होती. मात्र संपूर्ण शैक्षणिक कागदपत्रे आगीत भस्मसात झाल्याने या तरुणीसमोर भविष्यासंदर्भात मोठा प्रश्न उभारला आहे.Fire

सदर घटनेचा पंचनामा तहसीलदारांनी केला असून दुर्घटनेची माहिती घेऊन शासनाकडून सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अग्निशमन डाळीच्या जवानांनी यावेळी आग आटोक्यात आणली. यावेळी नगरसेवक मुझम्मिल डोणी, शकील मुल्ला यांच्यासह इतर अधिकारीही उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.